न्हावी प्रतिनिधी दि 12
येथे खान्देशाला एक वैभवशाली सांस्कृतिक परंपरा आहे .आणि त्यातल्या त्यात सातपुडा पट्यातील यावल तालुक्यातील पुढारलेले गाव म्हणजे न्हावी …!!
या गावाने जसे राजकीय धुरंधर , स्वातंत्रसेनानी , विख्यात शेतकरी आणि कलावंत दिले तसेच एक विशिष्ट पप्राचिन सांस्कृतिक परंपरा देखील आहे , ही अभिमानाची बाब आहे .
येथे 134 ्वर्षाची परंपरा आहे. अवघ्या काही तासातच चौदा ते पंधरा हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेत घेतात .
न्हावी गावाला धार्मिक , अध्यात्मिकबाबत विशेष महत्त्व असून या गावात अनेक धार्मिक स्थळे आहेत. अनेक सार्वजनिक सण-उत्सव येथे मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरे होत असतात . त्यापैकी एक म्हणजे येथील प्रसिद्ध श्रीनाथ मंदिर संस्थान ..!!
या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची देखणी मूर्ती आहे . तसेच श्री संत नारायणनाथ महाराज यांची समाधी आहे.
सद्गुरु श्री यांना नरहरीनाथ महाराज यांचे शिष्य संत नारायणनाथ महाराज यांनी १८८५ ला समाधी घेतली. मंदिरातील फरशीचे बांधकाम केले तेव्हा ही माहिती कळली ती अशी की , श्रीनाथ मंदिर संस्थानच्यावतीने श्री नारायणनाथ महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते , ही पुण्यतिथी श्रावण त्रयोदशी म्हणजेच ” *खान मळणी* ” हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो हा खान मळणीचा उत्सव पोळ्याच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रावण व!! 14 दिनांक 13/ 9 /2023 बुधवारी रोजी साजरा झाला. .
या उत्सवाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे रोडगे (शेकलेली बट्टी ) लोडगे या उत्सवाच्यानिमित्ताने गावातून वर्गणीच्या माध्यमातून अन्नदानाचा ( महाप्रसादाचा ) कार्यक्रम केला जातो. रात्री मंदिर परिसरात गोवऱ्या रचून त्यावर रोडगे भाजण्यास आरंभ होतो , यामध्ये गावातील ज्येष्ठ नागरिकांपासून तरूणवर्ग , सेवाभावी व्यक्ती , शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांचा सहभाग असतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंददायी भक्तिभाव ओसंडून वाहत असतो. या कार्यक्रमासाठी सुमारे २४ क्विंटल गहू ,18 क्विंटल गंगाफळ 1.25 क्विंटल तूर डाळ, व तुपाचा समावेश असतो. तसेच यासाठी दोन ट्रॅक्टर शेणाच्याच्या गोवऱ्यां तसेच केळीच्या बागेच्या सुकलेल्या गोवऱ्यांचा जगर पेटवून रोडगे शेकले जातात . न्हावीसह परिसरातील ,पिंपरुड , फैजपूर , हंबर्डी ,आमोदा कळमोदा, खिरोदा , बोरखेडा , सांगवी , भालोद , व मारूळ या गावासहीत सुमारे 14 ते 15 हजार ग्रामस्थ महाप्रसादाला एकात्मतेने एकत्र येतात .जवळजवळ वीस ते पंचवीस स्वयंपाकी यासाठी कार्यरत असतात.
कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी पूजा होऊन काशी फळाची भाजी याचा नैवेद्य दाखवण्यात येतो . परमपूज्य महाराज कथा ग्रामस्थ मंडळी मंदिराला पाच प्रदक्षिणा करतात. नामस्मरण करीत परिक्रमा पूर्ण झाल्यावर जयजयकार होऊन प.पू . महाराजांच्या आज्ञेनुसार भंडारा सुरू होतो . कार्यक्रमासाठी केळीच्या पानाचा वापर करण्यात येतो , अत्यंत शिस्त व एकात्मता ही या उत्सवाची लक्षवेधी परंपरा आहे सर्व जण अगदी झोकून विविध कामे करीत असतात .
दुपारी मठातील जुन्या मंडळींच्यावतीने पालखी बांधण्यात येते . पालखीत श्री पांडुरंग परमात्म्याची मूर्ती व सद्गुरु भानदास नाथ महाराज यांची प्रतिमा ठेवलेली असते. प्रथम प.पू . महाराजांचे दर्शन होऊन पालखी मिरवणूक सुरू होते , टाळ-मृदुंगाचा गजर होत असतो . वारकऱ्यांच्या भजनाने वातावरण भक्तीमय होऊन जाते. तसेच संध्याकाळी गुरूवर्य मोहननाथ महाराज पैठणकर श्री संत नरहरीनाथ महाराज संस्थान , देऊळगाव राजा यांच्या उपस्थितीत ह. भ.प. भरत महाराज , नाथ मंदिराचे सर्व ट्रष्टीव गावातील सर्व ग्रामस्थांनांनी यशस्वी साठी परिश्रम घेतले असा हा बैल पोळ्याच्या आदल्या दिवशी खांड मोहिनी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो..ही परंपरा सातत्याने समाज टिकवून आहे