न्हावी रस्त्यावर लूट, भुसावळातील टोळी जाळ्यात

0
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जळगाव : भुसावळ-न्हावी रस्त्यावर तक्रारदार स्वप्नील मोहन साळुंके (न्हावी) यांची दुचाकी अडवून लुटारूंनी मारहाण करीत 33 हजार 300 रुपयांचा ऐवज लूटला होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल केली असून या गुन्ह्यातील भुसावळातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटकेतील आरोपींमध्ये रिहान उर्फ छोटू हुसेन पटेल (19, लिम्पस क्लब, भुसावळ), शेख मोहसीन उर्फ बाटूक शेख सलीम, सयजद उर्फ पी.सैय्यद अहमद (18) व (दोन्ही रा. आगवाली चाळ, भुसावळ) यांचा समावेश आहे तर एका अल्पवयीन बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेतील आरोपींसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.
यांनी केली कारवाई 
पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय पाटील, शरीफ काझी, शशीकांत पाटील, राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, संजय पाटील,  सुरेश महाजन, युनूस शेख, दीपक पाटील, विलास पाटील, महेंद्र पाटील, गफूर तडवी, नरेंद्र वारूळे, चालक दीपक पाटील, प्रवीण हिवराळे यांनी ही कारवाई केली.