चाळीसगाव । चाळीसगाव नगरपालीकेचे सेवानिवृत्त व कायम, रोजंदारी सफाई कर्मचारी गेल्या आठवडाभरापासुन त्यांच्या मागण्यांसाठी चाळीसगाव तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसले होते दिनांक 24 पासुन सफाई कर्मचारी यांनी काम बंदचा इशारा दिल्यानंतर मुख्याधिकारी यांनी 59 लाख 45 हजार 645 रुपयांचा धनादेश दिल्यानंतर आमदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते निंबु पाणी देवुन उपोषण मागे घेण्यात आले.
काम बंदचा इशारा देताच दिला धनादेश
पालीकेचे सेवानिवृत्त कर्मचारी, रोजंदारी व कायम सफाई कर्मचारी यांचे नगर पालीकेकडे जवळपास 4 कोटी रुपये घेणे होते. यातील काही रक्कम वसुलीच्या 20 टक्के रक्कम कर्मचारी यांना अदा करावी म्हणजे जवळपास 88 लाख रुपये द्यावेत या मागणी साठी आगोदर साखळी उपोषण करण्यात आले त्यानंतर बेमुदत उपोषण सुरु करुन 24 एप्रिल पासुन काम बंदचा ईशारा सफाई कर्मचारी यांनी दिला होता. अखेर 24 रोजी मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी 59 लाख 45 हजार 645 रुपयांचा धनादेश देवुन उर्वरीत 28 लाख 90 हजार रुपये नंतर देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आमदार उन्मेषदादा पाटील यांच्या हस्ते निंबु पाणी देवुन कर्मचारी यांनी उपोषण मागे घेतले यावेळी तहसिलदार कैलास देवरे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, घृष्णेश्वर पाटील आदी मान्यवर व कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.
संभाजी सेनेचा पाठिंबा
यांच्या आंदोलनास संभाजी सेनेचे लक्ष्मण शिरसाठसह शिष्टमंडळांनी उपोषणकर्त्यांना भेटले आणि पाठींब्याचे पत्र दिले, जाहीर पाठिंबा देऊन शासनाने सदर मागन्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा संभाजी सेना नगर पालिके समोर उग्र आंदोलन करेल असा इशारा दिला होता. संभाजी सेनेच्या शिष्टमंडळामध्ये तालुका अध्यक्ष गिरीश पाटील, शेतकरी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र महाजन शहर अध्यक्ष अविनाश काकडे शहर कार्याध्यक्ष ज्ञायानेश्वर पगारे संदीप जाधव विजय गवळी बापूमामा कुमावत लालचंद सोनवणे दिवाकर महाले रवी शिनकर राकेश पवार गजेंद्र चंदनशिव प्रवीण पाटील नामदेव महाजन सुनील कुमावत वगैरे उपस्थित होते.