न.पा.तर्फे बचत गटांना ‘फिरता निधी’चा धनादेश वाटप

0

नंदुरबार। राष्ट्रीय उपजिविका अभियानाअंतर्गत नंदुरबार नगरपरिषदेच्या वतीने बचत गटांना फिरता निधीचा धनादेश वाटप करण्यात आला. नंदुरबार शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी नगरपालिकेच्या माध्यातून विविध योजना राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय उपजिविका अभियानाअंतर्गत बचत गटातील महिलांना नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्याहस्ते फिरता निधींचे धनादेश वाटप करण्यात आला.

याप्रसंगी नगरसेविका भारती राजपूत, मानसी मराठे, रमण सुतारे खालिदाबी खाटीक आदी उपस्थित होत्या गरीब महिलांना या योजनेतून उपजिविकेचे साधन निर्माण होणार आहे. त्यातून महिला स्वालंबी जीवन जगतील असे प्रतिपादन नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी केले.

शेतकर्‍यांना साहित्य वाटप : तालुक्यातील चौपाळे येथील संत दगा महाराज सेंद्रिय शेतकरी गटातील शेतकर्‍यांना जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेठ्ठी यांच्याहस्ते साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी आत्मा प्रकल्पाचे उपसंचालक सुभाष साळवे स्वामी समर्थ कृषी अध्यात्मीक केंद्राचे जे.टी.देवरे आर.यु.पाटील, तेजस देवरे, चंद्रकांत बागुल, भारत माळी, डॉ. प्रकाश पटेल, सुनिल चौधरी आदी शेतकरी उपस्थित होते. शेंद्रिय शेतीअंर्गत नंदुरबार जिल्ह्यात 900 एकर क्षेत्रावर शेतकर्‍यांचे 18 गट स्थान करण्यात आले आहेत. या गटातील शेतकर्‍यांना शेंद्रिय निविष्टा तयार करण्यासाठी लागणार्‍या साहित्यांचे वाटप जिल्हाधिकारी कलशेठ्ठी यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. आत्मा प्रकल्प अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.