न.पा. निवडणुकीचे बिगुल वाजले

0

नंदुरबार। । ये शहर है अमन का…. यहा की फिजा है निराली..यहा सब शांती शांती है! ही वादळापुर्वीची शांतता नंदनगरीसह जिल्ह्यात पसरलेली दिसून येत होती. अर्थात ही शांतता होती राजकीय गतिविधींची. प्रशासनाकडून प्रभागनिहाय नगरपालिकेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहिर झाले अन् निवडणुकीचे बिगुल वाजताच पक्ष कार्यालयांवर कार्यकर्त्यांची हजेरी सुरु झाली. यात पक्षाच्या कामात आपला सहभाग नोंदविण्यासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी ही धुळ झटकत पक्ष कार्यालये गाठली. निवडणूक म्हटली म्हणजे समिकरणांची जुळवा जुळव करण्यासाठी राजकीय वर्तुळाची ही परिक्षाच ठरते आहे.

पक्षवाढीच्या व संघटन उभारणीत शिवसेनाही नाही मागे
जिल्ह्यात भाजप, शिवसेना दोन्हीही पक्षांनी आपली कंबर कसली असून गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षवाढीच्या व् संघटनाच्या कामात शिवसेनाही मागे नाही, राष्ट्रीय काँग्रेसने नंदनगरीत विकास घडवून आणला आहे, त्यामुळे काँग्रेसचे आव्हान पेलणेही भल्याभल्यांना कठिन होणार आहे. इतर पक्षही यात आपले डावपेच खेळण्यात कमतरता करणार नसल्याचेच चित्र दिसते. नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात अनेक महत्वपूर्ण बदल झाले असून काही पक्षांची नेतृत्वाची धुरा ही बदलली आहे तर अनेकांचे आयाराम गयाराम झाल्याने अनेक समीकरण बदलले आहेत एवढे मात्र निश्चित, राष्ट्रिय कांग्रेस अन राष्ट्रवादी कांग्रेस् यांच्यात पहावयास मिळणारी चुरस आता भाजप ,काँग्रेस दरम्यान पाहायला मिळणार आहे.

राजकरणाची सूत्रे हालणार
जिल्ह्याचे ठिकाण असल्याने नंदनगरीतूनच जिल्ह्यातील राजकरणाची सूत्रे हालणार असल्याने अनेक दिवसांपासून जुने नवे उमेदवार पक्ष कार्यालयावर आपला मोर्चा वळवून होते, येणार्‍या निवडणूकित अनेक नवे चेहरे रिंगणात उतरणार असून तशी आखणी ही पक्षांतर्गत केली जात आहे, पालिका निवडणूकीसाठी वार्डनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे,त्यामुळे इच्छुकांनी धावपळ सुरू केली आहे, काहींच्या सुरक्षित वार्डाची रचना बदलली आहे ,त्यामुळे उमेदवारांना कंबर कसावी लागणार आहे. काहीही झाले तरी ही तर सुरुवात आहे. कोण काय डावपेच खेळेल, त्याचा राजकीय वर्तुळात काय प्रभाव पडेल हे तर येणारी वेळच् सांगणार आहे.

प्रात्यक्षित जनतेने अनुभवले
गल्ली ते दिल्ली चे राजकारण पाहता सर्वत्र भाजपची हवा आहे मात्र नंदुरबार नगरपालिका हा कांग्रेस चा गढ़ समजला जात असून गेल्या नगरपालिका निवडणुकीत त्यांचे प्रात्यक्षित जनतेने अनुभवले आहे, त्यावर कांग्रेस नेही नंदनगरीचे नंदनवन फुलवण्यास कसूर केला नसून विकासाचा आरसा जनते समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाआहे, यातून कांग्रेस विकासाच्या मुद्द्यावर तर भाजप आपल्या अजेंड्यावर जनतेसमोर जाणार असल्याचे चित्र पहावयास मिळणार यात शंका नाही.