नवापूर। शहरातील न.पा.चे आरक्षण सोडत कार्यक्रम टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले उपस्थित होते. यावेळी तहसिलदार प्रमोद वसावे,मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे उपस्थित होते या कार्याक्रमात सर्व पक्षाचे पदाधिकारी , इच्छुक हवसे गवसे उमेदवार,काही नगरसेवक उपस्थित होते नवापूर नगर पालिका हद्दीतील 10 प्रभागा मध्ये 20 उमेदवार असणार आहे. सोडत निघाल्यावर काही विद्यमान नगरसेवकांचा हिरमोड झाला तर काही इच्छुक भावी नगरसेवकांचा चेहर्यावर कही खुश कही गम दिसुन आले
असे राहणार आरक्षण
(1अ) अनुसुचित जमाती सर्वसाधारण (1ब) सर्वसाधारण स्ञी (2अ) अनुसुचित जमाती स्ञी (2ब) सर्वसाधारण (3अ) नागरीकांचा मागासप्रवर्ग स्ञी (3ब) सर्वसाधारण(4अ) नागरीकांचा मागासप्रवर्ग (4ब) सर्वसाधारण स्ञी(5अ) अनुसुचित जमाती स्ञी (5ब) सर्वसाधारण(6अ) नागरीकांचा मागासप्रवर्ग स्ञी (6ब) सर्वसाधारण(7अ)नागरीकांचा मागासप्रवर्ग(7ब) सर्वसाधारण स्ञी(8अ) अनुसुचित जाती स्ञी(8ब) सर्वसाधारण(9अ)अनुसुचित जमाती सर्वसाधारण(9ब) नागरीकांचा मागासप्रवर्ग स्ञी(10अ) अनुसुचित जमाती स्ञी (10ब) सर्वसाधारण अशा पध्दतीने आरक्षणसोडत काढण्यात आली आहे.
नविन मतदार नोंदणी जास्ती व्हावी
यावेळी तहसिलदार प्रमोद वसावे म्हणाले की मतदार जनजागृती करुन नविन मतदार नोंदणी जास्ती जास्त करावी त्यासाठी 6 नंबर फार्म आम्ही तुम्हाला देत आहोत असे सांगितले आरक्षण सोडती नंतर आपण कुठल्या प्रभागात सेफ होऊन निवडुन येऊन याबाबत चाचपणी सुरू आहे महिलांना सुध्दा थोडी निराशा झाली आहे काही प्रभागात गल्लीतील आमने सामने असलेली काही घरे दुसर्या प्रभागात गेल्याने काही रहिवासी निराश झाले तर काही ना प्रभागात सेफ झाल्याचा आनंद गगनात माझा मावेना अशी स्थिती झाली आहे एकुणच नगर पालिका निवडणुकीचे वारे वाहायला आता सुरुवात झाली असून अनेक प्रभागातुन विविध समस्या, निवेदन बाहेर येऊ लागली आहेत नगरपालिका निवडणुक काटे की टक्कर ठरणार असल्याचे दिसत आहे.