नेरुळ । न. मुं. पा. परिवहन विभागाला ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्या निधीतून थ्री बस वॉशिंग मशीन मिळाली आहे. त्यामुळे येत्या काही काळात नवी मुंबईच्या बसेस चकाचक झालेल्या नवी मुंबईकरांना पाहायला मिळू शकतील. ऑटोमॅटिक थ्री बस वॉशिंग मशीन न.मुं. परिवहन विभागाला देण्याबाबत खासदार राजन विचारे यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना तसे पत्रदेखील दिलेले होते.
सोमवारी होणार चाचणी
याबाबत प्रस्ताव मान्य होऊन या मशीनची खरेदी झालेली आहे तसेच ही मशीन बसवण्याचे काम सध्या सुरू झालेले असून येत्या सोमवारी व मंगळवारी या मशीनबाबत चाचणी घेण्यात येणार असून 21 तरखेंपासून हे मशीन सुरू होणार आहे. एकूण 12 लाख छत्तीस हजार 567 रुपयांचे मशीन असून याचा फायदा नक्कीच न.मुं.परिवहन सेवेला होणार आहे. याद्वारे नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न परिवहन विभाग करत आल्याचे परिवहन सदस्य विसाजी लोके यांनी सांगितले.