पंकजाताईंच्या विरोधात घोषणाबाजी खपवून घेणार नाही; धनंजय मुंडे आक्रमक !

0

परळी: संपूर्ण राज्याचे लक्ष परळी विधानसभेकडे लागले होते. परळीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे. परळीतून राष्ट्रवादीची विजयी रॅली सुरु आहे. यावेळी धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पंकजा मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर धनंजय मुंडे चांगलेच संतापले. जी घोषणाबाजी करायची आहे ती माझ्याबाबत करा, विरोधकांबाबत घोषणाबाजी केल्यास विचार करा असा सज्जड दम धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=139790000737525&id=100041195771932

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील भावनिक राजकारण बीड जिल्ह्यात खूप पेटले होते. शेवटच्या काही दिवसात ते अधिकच पेटले. धनंजय मुंडे यांच्या विधानावरून त्यांच्यावर खूप टीका झाली. त्यानंतर राजकीय वातावरण तापले होते.