पंकजा मुंडे यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह, पण…

0

मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजपचे विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी मराठवाड्यात आल्या होत्या. प्रचारादरम्यान त्यांना सर्दी, खोकला व ताप आल्याने त्या मुंबईला परतल्या. त्या होम आयसोलाटेड आहेत. दरम्यान त्याांनी कोरोना चाचणी केली असून रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे.

माझी covid ची टेस्ट negative आहे ..ज्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या काळजी व्यक्त केली त्यांचे आभार !! मी डॉक्टरांच्या चर्चेनंतर परत एकदा टेस्ट करेन मगच सार्वजनिक कार्यक्रमांना जाईन .. असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुन्हा टेस्ट करून सार्वजनिक उपक्रमात उपस्थित राहिले असे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.

काल मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांना फोन करून काळजी घेण्याचे सांगितलं होते.