पंकज, काजलला कॅरममध्ये मिळाले अग्र मानांकन

0

मुंबई । मुंबई जिल्हा कॅरम संघटना व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट माटुंगा यांच्या संयुक्त विद्यमाने 20 ऑगस्टपासून सेंट्रल रेल्वे कल्याण भवन हॉल, माटुंगा येथे आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात जैन इरिगेशनच्या पंकज पवार तर महिला एकेरी गटात इंडियन ऑईलचा काजल कुमारीला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेत पुरुष एकेरी, महिला एकेरी, मुले एकेरी ( 18 वर्षाखालील ), मुली एकेरी ( 18 वर्षाखालील ) अशा एकंदर 4 विभागात ही स्पर्धा खेळविली जाणार असून एकंदर 269 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे.

स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे
पुरुष एकेरी : पंकज पवार ( जैन इरिगेशन ), रियाझ अकबरअली ( एअर इंडिया ), महम्मद साजिद ( जैन इरिगेशन ), संदीप देवरुखकर ( ओएनजीसी ), महम्मद गुफरान ( इंडियन ऑइल ), योगेश धोंगडे ( जैन इरिगेशन ), अमोल सावर्डेकर ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ), विकास धारिया ( मुंबई महानगपालिका ).
महिला एकेरी : काजल कुमारी ( इंडियन ऑइल ), प्रीती खेडेकर ( पी सी डी ए ), अंजली सिरीपुरम ( आयुर्विमा महामंडळ ), शिल्पा पळणिटकर ( आयुर्विमा महामंडळ ), अनुपम केदार ( बँक ऑफ इंडिया ).आयेशा महम्मद ( जैन इरिगेशन ), स्नेहा मोरे ( इंडियन ऑइल ),समिधा जाधव ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ). मुले एकेरी ( 18 वर्षाखालील ) : रीतिकेश वाल्मिकी ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ), नीलांश चिपळूणकर ( ए के फाउंडेशन ),महम्मद जावेद गनी ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ),विवेक परमार ( बोरीचा स्पोर्ट्स क्लब ) मुली एकेरी ( 18 वर्षाखालील ) : मृणाली सुर्वे ( ए के फाउंडेशन ), अमुल्या राजुला ( शिवतारे कॅरम क्लब )