चोपडा। येथील पंकज माध्यमिक विद्यालयात, राष्ट्रीय हरितसेना व महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितिच्या संयुक्त विद्यमाने सर्पविज्ञान पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंकज महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी देसाई होते कार्यक्रमप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. अयुब पिंजारी यांनी विद्यार्थ्यांना सापांविषयी समाजात असलेल्या गैरसमजाविषयी माहिती दिली. साप हा शेतकर्यांचा मित्र आहे त्याला मारू नका असे आवाहनही त्यांनी केले. सागर बडगुजर आणि संदीप मालचे यांनी विद्यार्थ्यांना विषारी आणि बिना विषारी सापांबद्दल माहिती दिली.
यशस्वितेसाठी यांचे प्रयत्न
पोस्टरच्या माध्यमातून सापाबद्दलची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली व समाजातील सापांबद्दलची अंधश्रद्धा जसे साप दूध पितो, साप अनेक दिवसांनंतर प्रतिहल्ला करतो आदी शंका समाधान बडगुजर आणि संदीप मालचे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.आर.पाटील यांनी केले. कार्यक्रमास वन विभागाचे पी.एन. पाटील, विजय चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राष्ट्रीय हरितसेना प्रमुख पी.सी. पाटील यांनी केले. सदर कार्यक्रम यशिस्वीतेसाठी विजया पाटील, रतन माने, उदय गुजर, महेंद्र पाटील, विनोद जाधव, विक्रम निकम, दिवाकर बाविस्कर, देवेंद्र वैद्य, जोतिसिंग राठोड, बाजिराव तायड़े, जयेश मंडपे, दिपक सोनवणे, प्रमोद पाटील, जितेंद्र धनगर, गजेंद्र पावरा, पौर्णिमा भादले, वैशाली पाटील यांनी प्रयत्न केले.