पंचवार्षिक संरक्षण योजना तयार

0

नवी दिल्ली – पाकिस्तान आणि चीनच्या हातमिळवणीमुळे निर्माण झालेल्या संरक्षणविषयक असुरक्षिततेमुळे आणि भारताचे भूराजनैतिक महत्वही वाढावे म्हणून संरक्षण पंचवार्षिक योजनेसाठी २६ कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी माहिती दिली की २०१७ ते २०२२ ची पंचवार्षिक संरक्षण योजना तयार करण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेशी तसेच संरक्षणाशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा करून २६ कोटी ८३ लाख ९२४ इतक्या खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या युनिफाईड कमांडर परिषदेत हा प्रस्ताव सादर करण्यात आला.

संरक्षण विभागाची ही १३ वी पंचवार्षिक योजना आहे आणि या योजनेवरच लष्कराच्या वार्षिक योजना अवलंबून आहेत. त्यामुळे लवकारात लवकर अंदाजपत्रकाला मान्यता मिळावी असा संरक्षण विभागाचा प्रयत्न आहे. सिक्कीम-भूतान-तिबेट ह्या तीन सीमांवर तणाव आहे आणि नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानचा गोळीबार सुरू आहे. अशा परीस्थितीत इतक्या वाढीव खर्चाची योजना सादर करण्यात येत आहे.

कमांडर परिषदेला उपस्थित असलेले संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी संरक्षण विभागाला आधुनिकीकरणासाठी भांडवली खर्च उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले. जेटली यांनी भूदल, नौदल आणि हवाईदल यांच्या आधुनिकीकरणासाठी तरतूद कमी होत चालली होती. त्याच प्रमाणे संरक्षण विभागात मंजूर केलेली रक्कमही खर्च होत नव्हती याकडे जेटली यांनी लक्ष वेधले. चीनवर लक्ष ठेऊन पंचवार्षिक योजनेत खास क्षमता विकासावर तरतूद करण्यात आलेली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत दुर्लक्ष झालेल्या अंदमान आणि निकोबारमधील तळांवर विशेष यंत्रणा तैनात केल्या जातील, असेही संरक्षण मंत्री म्हणाले.