पंचशिल नगरात नाला सफाईस प्रारंभ

0

भुसावळ। येथील पंचशिल नगर प्रभाग क्रमांक 18 मधील नाल्याची तात्काळ सफाई पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी अन्यथा उपोषणाचा इशारा प्रभागाचे नगरसेवक रवी सपकाळे यांनी दिल्याची दखल घेत पालिका प्रशासाने तात्पुरत्या स्वरुपात नालेसफाईस सुरुवात केली आहे. पावसाळ्याला लवकरच सुरुवात होत असून त्यामुळे नाल्या काठांवरील घरांमध्ये पाणी शिरुन पंचशिल नगर, गौतम नगर आदी भागातील नागरिकंचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवक रवी सपकाळे यांनी उपोषणाचा पावित्रा घेतल्याने पालिकेने दखल घेतली.

यांची होती उपस्थिती
यावेळी नगरसेवक रवी सपकाळे, ए.पी. फालक, एन.पी. पाटील, वसंत राठोड, पी.डी. पवार, दिलीप सपकाळे उपस्थित होते.