पंचशील कॉलनीत महिलांचा सन्मान

शहादा: शहरातील पंचशील कॉलनीत पत्रकार बापू घोडराज यांच्या कुटुंबांच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा केला. जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील पंचशील कॉलनीतील महिलांचा सन्मान झाला पाहिजे, असा संकल्प पत्रकार बापू घोडराज आणि अलका घोडराज यांनी मांडला होता. सोमवारी रात्री 8 वाजता कॉलनीतील महिलांना एकत्रीतपणे बोलावून ज्येष्ठ महिला सुरेखा कुवर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी अलका घोडराज यांच्या हस्ते वैशाली नरेंद्र महिरे, रंजना आखाडे, आशा शांतीलाल अहिरे, चेतना प्रवीण खाडे, सीमा चंद्रविलास बिर्‍हाडे, सुनंदा संतोष कुवर, निशा राजेद्र आगळे, दीपा युवराज घोडराज, सुरेखा मिलिंद शिरसाठ, सारिखा रवींद्र आखाडे, अरूणा शेखऱ गवळे, अम्रपाली महिरे, प्रेरणा अहिरे, अंबानी घोडराज, मृणाल शिरसाठ, अनुष्का घोडराज, विशाखा महिरे आदी महिलांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. यावेळी केंद्रप्रमूख नरेंद्र महिरे, वैशाली महिरे, बापू घोडराज यांनी मनोगत व्यक्त केले. अलका घोडराज यांनी आभार मानले.