पंचायत समितीची आढावा बैठक संपन्न

0

रावेर : पंचायत समितीची शेवटची आढावा बैठक सभापती हसिना तडवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. येथील पंचायत समिती सभागृहात मंगळवार 3 रोजी आढावा बैठक घेण्यात आली. पुढील काही दिवसात निवडणूक असल्याने या शेवटच्या मासिक सभेला विविध विकासात्मक विषय मांडण्यात आले. यावेळी विकासात्मक मुद्यांना मंजुरी देण्यात आली. सभेस उपसभापती रेखा चौधरी, सदस्य सुनिल पाटील, जनाबाई महाजन, महेश पाटील, अलका चौधरी, विजया पाटील, नंदकिशोर महाजन, अनिल तडवी, मायादेवी बार्‍हे आदी सदस्य उपस्थित होते.

दत्तक योजनेंतर्गत 186 विद्यार्थ्यांना धनादेश वाटप
गटविकास अधिकारी डॉ. सानिया नाकाडे यांनी विविध विषय सदस्यांसमोर ठेवून चर्चा केली. यावेळी सर्व सदस्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दत्तक योजनेंतर्गत 186 विद्यार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी धिमकेे व शिक्षक उपस्थित होते.