पंचायत समितीच्या दिरंगाई व हलगर्जी कारभाराने कळस गाठले असुन ग्रामपंचायत अपहार प्रकरणी उपोषणास सहावा दिवस

यावल ( प्रतिनिधी ) येथील पंचायत समितीच्या कार्यालया समोर शेखर पाटील व त्यांचे सहकारी यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस असुन,उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालवली असुन उपोषणकर्त्यानी उपचार घेण्यास मात्र नकार दिला आहे. तालुक्यातील सावखेडासिम येथील ग्रामपंचायत मधील सन २०२० ते २०२२ या कालावधीत दरम्यान प्राप्त पंधराव्या वित्त आयोग निधी मध्ये ग्रामपंचायती च्या कारभाऱ्यांकडून झालेल्या अपहार संदर्भात तसेच ग्रामनिधी व पाणीपुरवठा निधी अंतर्गत बँकेत पैसे जमा न करता परस्पर खर्ची झाले असल्याची तक्रार करण्यात आली असुन , रावेर यावल आमदार शिरीष मधुकरराव चौधरी ,उपोषणकर्ते माजी पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी केलेल्या तक्रारी वरून ग्रामविस्तार अधिकारी यांचे कडून चौकशी अहवाल प्राप्त झाल्या नंतर ही पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांनी त्यावर काही ही कारवाई केलेली नसल्याने आपले विरुद्ध ,महाराष्ट्र नागरी सेवा१९८१ अंतर्गत कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत चा खुलासा चार दिवसाचे आत सादर करावा तसेच प्राप्त अहवालानुसार अपहार व अनियमित्ता असल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित करून जबाबदार व्यक्तीवर करावयाच्या कार्यवाहीचा, प्रस्तावा सोबत उपस्थित राहावे आवश्यकता असल्यास तात्काळ राज्य शासनाचे ग्रामविकास विभागाकडील ४ जानेवारी २०१७चे पत्रान्वय कारवाई करावी असे पत्र प्राप्त झाल्यावर देखील गटविकास अधिकारी यांच्या हलगर्जीपणाने व प्रशासनाच्या दिरंगाईने कळस गाठला असुन उपोसणकर्त्यांच्या जिवावर बेतले आहे,उपोषणाचा आज दिनांक १७ ऑगस्ट रोजी सहावा दिवसी असुन, माजी आमदार रमेश चौधरी यांच्यासह महाविकास आघाडीचे शिवसेना ( उबाठा )चे संतोष खर्चे, शरद कोळी ,पप्पु जोशी,अजहर खाटीक,सारंग बेहडे,सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे , तालुका उपाध्यक्ष सैय्यद असद जावेद अली,दहिगावचे सरपंच अजय अडकमोल,राष्ट्रवादीचे विजय पाटील, युवक राष्ट्रवादी पवन पाटील,राजेश करांडे यांचा पाठींब्या मिळाला असुन , मालोद येथील श्री स्वामीनारायण मंदिराचे परमपुज्यप्रभुजी स्वामी महाराज यांनी उपोषणाच्या ठिकाणी भेट देवुन उपोषणकर्त्यांनी आस्येने प्रकृती विचारणा केली तसेच यावल तालुक्यातुन विविध स्तरावरून पाटील यांच्या उपोषणाला मोठा पाठींबा मिळत आहे. पंचायत समितीच्या प्रशासना कडुन उपोषणकर्ते शेखर पाटील व त्यांचे सहकारी रहेमान रमजान तडवी , सलीम मुसा तडवी यांच्या उपोषणाची अद्याप प्रशासनाने दखल न घेतल्याने प्रशासनाचे लाजिरवाणी प्रकार समोर आले असुन,आज उपोषणा च्या सहाव्या दिवसी उपोषणक्रत्यांची प्रकृती अत्यंत खालवली असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांकडून डॉ प्रशांत जावळे यांच्याकडून मिळालीअसुन असेअसतांना देखील उपोषणकर्त्यांनी औषद्य उपचार घेण्यास नकार दिला आहे.