पंचायत समितीत सरपंच ग्रामसेवक समन्वय बैठक

0

जळगाव : जळगाव तालुक्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी जळगाव पंचायत समितीत तालुक्यातील सर्व सरपंच आणि ग्रामसेवक समन्वय समितीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत स्वच्छ भारत अभियान, घरकुल योजना, कॅशलेस व्यवहार आदी विषयांवर आढावा घेण्यात आले. सरंपच आणि ग्रामसेवकांनी गावाच्या विकासासाठी समन्वयाची भुमिका घेऊन विकास साधाला पाहिजे असे मत या बैठकीत जळगाव तहसिलदार अमोल निकम यांनी व्यक्त केले. 7 डिसेंबर रोजी विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विकास कामांचा आढावा घेतला यावेळी त्यांनी योजनांच्या उद्दिष्टपूर्तीत जिल्हा पिछाडीवर असल्याचे मत नोंदविले होते. त्याअनुषंगाने तालुकास्तरीय अधिकार्‍यांची आढावा बैठक घेण्यात येत आहे.

आवास अ‍ॅप’चे उद्घाटन
विविध घरकुल योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी आवास अ‍ॅप चे अनावरण याप्रसंगी करण्यात आले. या अ‍ॅपद्वारे पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना आदी घरकुल योजनेसाठी अर्ज सादर करता येणार आहे. ग्रामसेवकांना ह्या अ‍ॅपचे अर्ज करण्याचे सादरीकरण करुन दाखविण्यात आले. यावेळी खेडी येथील ग्रामसेवकांवर झालेल्या हल्लाचा सर्व सरपंचांनी निषेध करून तसा ठरावही यावेळी बैठकीत मांडण्यात आला. यावेळी जळगाव तालुका तहसिलदार अमोल निकम, पंचायत समिती गटविकास अधिकारी तुषार जाधव उपस्थित होते.