पंचायत समितीसमोर ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे बेमुदत उपोषण सुरु

0

यावल । किमान वेतन आयोग लागू करावा, या मागणी पाडळसे ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांनी, तर ग्रॅज्युईटीच्या रकमा मिळाव्या यासाठी हिंगोणा येथील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरूवात केली. यापैकी हिंगोणा येथील कर्मचार्‍यांचा प्रश्न सोडवल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले.

राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटकच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. त्यात हिंगोणा पंचायतीतून सन 2011 पासून निवृत्त झालेनंतर भवरलाल धंजे, रूख्मिणीबाई धंजे, रामा आदीवाले,कमलबाई आदीवाले, अशोक राणे भागवत सोनवणे यांची ग्रॅच्युईटीची अर्जित रजेची रक्कम देणे, तर पाडळसे ग्रामपंचायतीमधील विजय रल, नरेश चनाल, सुशिल रल, सुशिला चनाल, प्रवीण झांबरे यांनी किमान वेतन कायद्यासाठी उपोषणास सुरुवात केली. मात्र, हिंगोणा येथील कर्मचार्‍यांचा प्रश्न संघटनेचे जिल्हाध्यक्ष अतुल महाजन यांच्या मध्यस्थिने सुटला. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतले. उवर्रित पाच जणांचे आंदोलन मात्र कायम आहे.