पंचायत समिती विहीर घोटाळ्यात नार्कोटेस्टची मागणी करणार

0

चाळीसगाव । दोन दिवसापूर्वी चाळीसगाव पंचायत समितीचे सभापती, उपसभापती यांनी विहीर प्रकरणात राष्ट्रवादीचे जि.प. सदस्य, पं. स. सदस्य यांनी पैसे खाल्ल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देतांना 18 सप्टेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत अजय पाटील यांनी ह्हिरी वाटप व पैसे खाल्ले संदर्भात नार्केा टेस्टची मागणी करणार असून व मी पैसे खाल्ले असतील तर सिद्ध करा, अन्यथा सभापती, उपसभापती यांचेवर अब्रुनुकसानीचा दावा ठेकणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत त्यांनी दिली आहे.

सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील यांनी आरोप केला की, राष्ट्रवादीचे गटनेते पं. स. सदस्य अजय पाटील यांच्या हिरापूर येथील 23 लाख 96 हजार रुपयांची कामाची प्रशासकीय मान्यता दिली. त्यात माझा काही संबंध नाही ते काम ग्रामपंचायतीचे आहे. माझ्या नावे ते काम मंजूर असेल तर मी पदाचा राजीनामा देईल उलट विहिरींचे जमा झालेले पैसे 5 लाख 60 हजार रुपये सभापतीचे पती दिनेश बोरसे व उपसभापती संजय पाटील यांना गटविकास अधिकारी यांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला विहिरींचे पैसे आम्ही घेतले असतील तर सर्व 14 सदस्य व गटविकास अधिकारी या सर्वांची नार्को टेस्ट करावी त्याला लागणारे पैसे भरण्यास मी तयार आहे, अशी माहिती त्यांनी देत विहरींचे पैसे घेतल्याचे आरोप करणारे सभापतीनी स्वत:च्या चार लेटरपॅडवर 156 ते 164 विहिरी मागितल्या हा अधिकार त्यांना कोणी दिला असेही त्यांनी यावेळी सांगितले. जि.प. सदस्य शशिकांत साळुंखे यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून विहीरी संदर्भात माझा काहीही संबंध नाही. माझी पत्नी सभापती असतांना एक ही विहीर दिली नाही मग मी पैसे खाणार कुठून असे सांगत माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईल असे सांगत आरोप करणार्‍यांनी दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा त्यांचेवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विहरींची मागणी करण्याचा अधिकार ग्रामपंचायतचा आहे. ग्रामपंचायतकडून आलेल्या यांद्यामधील शेतकर्‍यांना क्रमवारीने विहीरी मंजूर कराव्यात, अशी आमची मागणी असून मंजूर झालेल्या 481 विहिरींची प्रशासकीय मान्यता रद्द करावी अशी आमची मागणी आहे. प्राधान्य क्रमाने प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून घेऊन त्यांनाच नव्याने प्रशासकीय मान्यता द्यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. पैशाचा आरोप झालेले पं.स.सदस्य विष्णु चकोर, बाजीराव दौंड यांनी आम्ही पैसे घेतले असल्याचे सभापती, उपसभापती यांनी सिद्ध करावे अशी मागणी केली. यावेळी माजी जि.प. सदस्य ओंकार चव्हाण, दूध संघाचे प्रमोद पाटील, पं.स. सदस्य जिभाऊ पाटील, सुनिल पाटील, शिवाजी सोनवणे आदि पत्रकार परिषदेस उपस्थित होते.