पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड शांततेत

0

जळगाव । जिल्ह्यातील 15 पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी मंगळवारी 14 फेब्रुवारी रोजी निवड प्रक्रिया सुरू झाली. दुपारी 3 वाजेपर्यंत आपला उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याची मुदत होती. दरम्यान काही ठिकाणी आरक्षणामुळे बिनविरोध निवड करण्यात आली. तर इतर ठिकाणी उपसभापती पदासाठीच अधिक चुरस सर्वत्र दिसून आली. निवडणूक निर्णय अधिकारींनी निवडीची घोषणा करताच कार्यकत्यांनी एकच जल्लोष केला. तसेच फटाके फोडुन गुलाल उधळून करून उपस्थितांना पेढे वाटप करण्यात आले तर विजयी उमेदवारांची वाजत गाजत, आदिवासी नृत्याच्या अनोख्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात जळगाव, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, रावेर, भुसावळ, पाचोरा, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव येथे भाजपाचा ताबा तर धरणगाव, एरंडोल व भडगाव येथे शिवसेनेने घेतले. पारोळा येथे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत. तर यावल येथे कॉग्रेस पुरस्कृत भाजपा उमेदवार विजयी झालेत.

सभापती यमुनाबाई रोटे तर उपसभापती शितल पाटील
जळगाव । येथील पंचायत समितीचे सभापतीपद अनुसुचित जाती महिलेसाठी राखीव असल्याने सभापतीपदाच्या निवडणूकीत भाजपाकडे बहुमत नसतांना यमुनाबाई रोटे सभापती पदावर विराजमान झाल्या असुन स्पष्ट बहुमत असतांना देखील शिवसेनेला आरक्षीत जागेचा उमेदवार निवडून न आल्याने उपसभापतीपदावर समाधान मानवे लागले आहे. सेनेच्या शितल पाटील यांंना उपसभापतीपदाची संधी मिळाली आहे. सभापती व उपसभापतीपदाची निवड बिनविरोध झाली. पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवड प्रसंगी पिठासीन अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी जलन शर्मा उपस्थित होते. सभापतीपदासाठी भाजपच्या यमुनाबाई रोटे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. तर उपसभापतीपदासाठी शिवसेनेच्या शितल कमलाकर पाटील यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारींनी दोघांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा सत्कार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केला. त्यानंतर सभागृहाबाहेर ना.गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे व भाजपाच्या पदाधिकारींनी सत्कार केला. या निवडीनंतर सभापती व उपसभापतींच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाज़ी करीत ज़ल्लोष केला तसेच पेढे भरवून आनंद साजरा केला.

चाळीसगाव पंचायत समितीवर भाजपचा झेंडा
सभापतीपदी स्मितल बोरसे ; उपसभापतीपदी संजय पाटील
चाळीसगाव । चाळीसगाव पंचायत समिती सभापती / उपसभापती निवडीची प्रक्रियेत भाजपने बाजी मारली असून सभापती पदी भाजपच्या स्मितल दिनेश बोरसे तर उपसभापती पदी संजय भास्कर पाटील यांची निवड झाली आहे. तर निवडीच्या दरम्यान राष्ट्रवादीच्या महिला सदस्याने स्वःत उपसभापती पदाच्या उमेदवार असतांना हात वर न केल्याने भाजपाला बहुमत मिळाले असून त्या उमेदवाराने असे का केले ? हा मात्र चर्चेचा विषय होता. यात काही मॅनेज तर झाले नाही ना ? अशी चर्चा सुरु होती. निवडणूक झाल्यानंतर भाजप व राष्ट्रवादीला बहुमत मिळाले नसल्याने 7-7 जागांवर त्यांना समाधान मानावे लागले होते. तेव्हा पासून पंचायत समिती सभापती होणार कोण ? याकडे तालुका वासियांचे लक्ष लागले होते. सभापती पद हे सर्व साधारण महिला साठी आरक्षित असल्याने पंचायत समिती वर महिला सभापती होणार हे निश्चित असले तरी कोणत्या पक्षाची महिला सभापती होणार हे मात्र निश्चित नव्हते. या निवडणुकीत अपक्ष अथवा दुसर्‍या पक्षाचा एकही उमेदवार नसल्याने फोडा-फोडीचे राजकारण होणार नाही म्हणून हि निवड ईश्वर चिठ्ठीने होईल अशी शक्यता वर्तविली जात होत.सकाळी 11 ते 1 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करायचे असल्याने सभापती व उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या सौ सुनीता जिभाऊ पाटील यांनी अर्ज दाखल केला होता तर सभापती व उपसभापती पदासाठी सौ लता बाजीराव दौंड यांनी देखील 2 अर्ज दाखल केले होते मात्र सुनीता जिभाऊ पाटील यांचा सभापती पदाचा अर्ज प्रतिज्ञापत्रावर त्यांचे नाव नसल्याने त्यांचा सभापती पदाचा अर्ज बाद झाला व उपसभापती पदाचे कागदपत्र पूर्ण असल्याने तो अर्ज वैध ठरला. तर तसाच काहीसा उलट प्रकार सौ लता बाजीराव दौंड यांचा झाला त्यांच्या उपसभापती पदाच्या अर्ज प्रतिज्ञापत्रावर त्यांचे नाव नसल्याने तो अर्ज बाद होऊन सभापती पदाचा अर्ज वैध ठरला. तर भाजपच्या वतीने बहाळ गणाच्या सदस्या सौ स्मितल दिनेश बोरसे यांनी सभापती पदासाठी तर उपसभापती पदासाठी भाजपचे संजय भास्कर पाटील पातोंडा गण यांनी प्रत्येकी एक – एक अर्ज दाखल केला होता. सकाळी 11 ते 1 या वेळेत वरील उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. माघारीची वेळ 3:30 पर्यंत असल्याने कुणीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नसल्याने अखेर 3:30 वाजता सर्व 14 सदस्यांनी हात उंचावून मतदान करण्याची प्रक्रिया करण्यात आली यामध्ये सभापती पदासाठी हात उंचावून मतदान प्रक्रिया झाल्याने त्यात भाजपच्या 7 सदस्यांनी हात वर केलेत तर राष्ट्रवादीच्या सौ सुनीता जिभाऊ पाटील यांनी हात वर न केल्याने बहुमत भाजपच्या बाजूने झुकले त्या मुळे भाजपच्या सौ स्मितल बोरसे यांना 7 मते तर राष्ट्रवादीच्या लता बाजीराव दौंड यांना 6 मते मिळाल्याने स्मितल बोरसे यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर उपसभापती पदासाठी त्याच प्रमाणे हात वर करून मतदान करण्याची प्रक्रिया सुरु झाली त्यावेळेस भाजपच्या 7 सदस्यांनी हात वर केलेत मात्र राष्ट्रवादीच्या उपसभापती पदाच्या उमेदवार सौ सुनीता पाटील यांनी स्वतः साठी देखील चक्क हात वर न केल्याने तेथे देखील भाजपचे पारडे जड झाल्याने उपसभापती म्हणून भाजपचे संजय पाटील यांना विजयी घोषित करण्यात आले. पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी शरद पवार यांनी कामकाज पाहिले यावेळी गट विकास अधिकारी मधुकर वाघ उपस्थित होते यावेळी गट विकास अधिकारी मधुकर वाघ, पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिरसाठ तसेच पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कायदा सुव्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यावेळी आमदार उन्मेष पाटील, नागराध्यक्षा आशालता चव्हाण, तालुकाध्यक्ष के बी साळूंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, न पा गटनेते राजेंद्र चौधरी, यांच्या सह भाजपचे प स सदस्य, जि प सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जल्लोष साजरा करून मिरवणूक काढण्यात आली होती.

बोदवड पंचायत समिती सभापती निवड बिनविरोध
सभापतीपदी गणेश पाटील तर उपसभापतीपदी दिपाली राणे
बोदवड । येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाचे गणेश सिताराम पाटील यांची तर उपसभापतीपदी दिपाली जीवन राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बोदवड पंचायत समितीचे चार सदस्य असून चारही जागी भारतीय जनता पार्टीचे संपुर्ण बहुमत असल्यामुळे सभापती व उपसभापतीची निवड बिनविरोध झाली. पिठासीन अधिकारी म्हणून तहसिलदार भाऊसाहेब थोरात होते. गणेश पाटील हे पंचायत समितीचे 12 वे सभापती म्हणून पदभार घेतील. बोदवड पंचायत समितीला पंधरा वर्षात अकरा सभापती लाभले त्या 11 पैकी भरत पाटील, लिलाबाई सोनवणे, सुरेश धनके या 3 जणांनी प्रभारी सभापतीपद सांभाळले आहे.

पारोळा पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा
सभापतीपदी सुनंदा पाटील तर उपसभापती अशोक पाटील
पारोळा । पारोळा पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकत सत्ता कायम राखण्यात त्यांना यश मिळाले. सभापती पदी शिरसमणीच्या गणाच्या सुनंदा पांडुरंग पाटील (हिरवी) यांची 1 मताने निवड झाली तर उपसभापती पदी शिरसोदे गणाचे अशोक नगराज पाटील (आंबापिंप्री)हे देखील एक मताने विजयी झालेत. यात भाजपाच्या सुजाता बाळासाहेब पाटील या तटस्थ म्हणजे गैरहजर राहिल्याने त्यांची किंग मेकरची भूमिका राहिली. यावेळी सभापतीपदासाठी रा.कॉ.कडून सुनंदा पांडुरंग पाटील व उपसभापती पदासाठी अशोक नगराज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला, तर शिवसेनेकडून सभापती पदासाठी छायाबाई जितेंद्र पाटील (इंधवे) व उपसभापती पदासाठी प्रमोद जाधव (शिरसोदे) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. भाजपाच्या सुजाता बाळासाहेब पाटील या मतदानाला गैरहजर राहिल्याने निवड प्रक्रियेत रा.कॉ.च्या सुनंदा पाटील यांना 4 बोट उंच होत 4 मते पडली. तर सेनेच्या छायाबाई पाटील यांना 3 मते पडली. त्यांचा 1 मताने पराभव झाला. त्या प्रकारे उपसभापतीसाठी रा.काँ.च्या अशोक पाटील यांना 4 मते तर सेनेच्या प्रमोद जाधव यांना तीन मते पडली. एक मताने अशोक पाटील उपसभापती पदी विजयी घोषित करण्यात आले. जर भाजपाच्या सुजाता पाटील या मतदान प्रक्रियेत हजर राहिल्या असल्या तर मग ईश्‍वर चिठ्ठीने सभापती पदाचा फैसला राहिला असता. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार वंदना खरमाळे व गटविकास अधिकारी आर.के.गिरासे यांनी सभापती व उपसभापती पदाचे उमेदवार सुनंदा पाटील व अशोक पाटील यांचे विजयी नावे जाहीर करताच रा.काँ.पाटीच्या कार्यकत्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत ढोल-ताश्यांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. आ.डॉ.सतीश पाटील, माजी खा.अ‍ॅड.वसंतराव मोरे, जि.प.सदस्य रोहन पाटील, हिंमत पाटील आदींनी या नवनिर्वाचित सभापती सुनंदा पाटील व उपसभापती अशोक पाटील यांचे स्वागत केले. या नवनिर्वाचितांची विजयी मिरवणूक पं.स.सभागृह ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आली. याप्रसंगी आ.डॉ.सतीश पाटील म्हणाले की, भाजपाने तटस्थ राहण्याच्या भूमिकेचे आपण स्वागत करीत आहोत. पंचायत समितीच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याच्या आहेत. सभापती व उपसभापती पदाची झालेली ही निवड सव्वा-सव्वा वर्षासाठी आहे. सत्तेत सर्वांना समावून घेत नेतृत्वाची संधी सर्वांना या माध्यमातून मिळणार आहे. पारोळ्यात ज्या प्रमाणे पं.स. रा.काँ.च्या ताब्यात आली. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी इतिहास होणार आहे. रा.कॉ.सत्ते राहिल, असा विश्‍वास यावेळी व्यक्त करीत जनतेने जो विश्‍वास आपल्यावर दाखविला त्याला तडा न जावू देता विश्‍वासाने सार्थ ठरविला जाईल, असे सांगितले. यावेळी मनोराज पाटील, राजेंद्र पाटील, डॉ.शांताराम पाटील, ता.÷अध्यक्ष बाळू पाटील, मुकेश पाटील, गोविंद पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, मा.जि.सदस्य पांडुरंग पाटील, कैलास पाटील, मा.उपसभापती चंद्रकांत पाटील, जिजाबराव पाटील यांचेसह रा.कॉ.चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जामनेर सभापतीपदी संगीता पिठोडे
उपसभापतीपदी गोपाल नाईक बिनविरोध
जामनेर । येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी पळासखेडे प्र.न. गणातून निवडून आलेल्या भाजपाच्या सदस्या संगीता आनंदा पिठोडे तर उपसभापतीपदी देऊळगाव गणातून निवडून आलेले भाजपाचेच सदस्य गोपाल धिरसिंग नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 14 रोजी पंचायत समितीच्या नविन प्रशासकीय इमारतींमध्ये तहसिलदार नामदेव टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. दुपारी 3 वाजेपर्यंत सभापती पदासाठी संगीता पिठोडे तर उपसभापती पदासाठी गोपाल नाईक यांचे एकमेव अर्ज आल्याने अध्यक्षांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. पंचायत समितीच्या 14 जागापैकी भाजपाने 10 जागा आपल्या ताब्यात ठेवत पुन्हा एकदा पंचायत समितीवर आपले वर्चस्व सिद्ध केले. यावेळी पंचायत समिती गटनेते अमर पाटील, सदस्य रमण चौधरी, सुरेश बोरसे, एकनाथ लोखंडे, जलाल तडवी, रुपाली पाटील, निता पाटील, सुनंदा पाटील, जि.प.अध्यक्षा प्रयाग कोळी, जि.प.सदस्या रंजनी पाटील, अमित देशमुख, विद्या खोडपे, विलास पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितु पाटील आदी उपस्थित होते.

पाचोरा पं.स. सभापतीपदी भाजपाचे सुभाष पाटील बिनविरोध
उपसभापतीपदी काँग्रेसच्या अनिता पवार
पाचोरा । पाचोरा पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाचे सुभाष पाटील यांची तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या अनिता पवार यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर भाजपा व काँग्रेसतर्फे घोषणाबाजी करत जल्लोष करण्यात आला. प्रांताधिकारी गणेश चौधरी, कार्यालय अधिकारी चंद्रकांत चौधरी यांचेसह सर्व नवनिर्वाचित पं.स.सदस्य उपस्थित होते. सभापती पदासाठी भाजपातर्फे लोहटार गणातून विजयी झालेले सुभाष पाटील व बंबरुड राणीचे गणातून विजयी झालेल्या कॉग्रेसच्या अनिता पवार व शिवसेनेचे कुर्‍हाड गावतून विजय झालेले ज्ञानेश्‍वर सोनार या दोघांनी मुदतीच्या आत माघार घेतल्याने पिठासीन अधिकारी मनिषा खडसे यांनी सभापतीपदी सुभाष पाटील व उपसभापतीपदी अनिता पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले या निवडी नंतर भाजपा व काँग्रेसतर्फे जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपाचे सदाशिव पाटील, डी.एम. पाटील, मधुकर काटे, अमोल शिंदे, सतीष शिंदे, नंदू सोमवंशी, दत्तात्रय बोरसे, रेखा पाटील, सुधीर पुणेकर, कांजीलाल जैन, विजया पाटील, काँग्रेसचे अ‍ॅड. अभय पाटील, सचिन सोमवंशी, नंदू सोनार, यांचेसह पादाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभापती निवसास्थानी नवनिर्वाचितांची बैठक व सत्काराचा कार्यक्रम झाला. गुलाल, फूले, उधळून, ओवाळनी करुन आनंद उत्सव करण्यात आला.

धरणगाव तालुक्यात पंचायत समितिवर शिवसेनेचा झेडा
धरणगाव । धरणगाव पंचायत समिती येथे सभापती व उपसभापती यांची निवड करण्यात आली. शिवसेनेचे ऐकून 5 सदस्य आणि भाजपाचे 1 सदस्य असे निवडले होते. त्यामुळे शिवसेनेला स्पष्ट बहुमत असल्याने सभापती आणि उपसभापती दोन्ही जागेवर शिवसेनेने सत्ता स्थापन केली. सभापतीपदी चांदसर गटातील सौ मंजुषा सचिन पवार तर उपसभापती पदी सोनवद गटातील श्री प्रेमराज बाजीराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवड प्रसंगी राज्याचे सहकार राज्यमंत्री मा ना गुलाबरावजी पाटील, धरणगावचे नगराध्यक्ष श्री सलीम पटेल, शिवसेना तालुका प्रमुख श्री गजानन पाटील, जिल्हा बँक संचालक संजय पवार, जि.प. सदस्य गोपाल चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, पं.स. सदस्य मुकुंद ननावरे, अनिल पाटील, सचिन पवार, प्रमोद पाटील, हुकूमचंद पाटील, जानकीराम पाटील, दीपक सोनवणे, पी पी पाटील, नितीन पाटील, मोतीलाल पाटील, मोहन महाजन, गोकुळ पाटील, बबलू पाटील, नवल पाटील, निलेश पाटील, विश्वनाथ पाटील, एन. एस. पाटील आदी व सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अमळनेर पं.स. सभापती व उपसभापती बिनविरोध निवड
अमळनेर । येथील पंचायत सभापती व उपसभापती निवड बिनविरोध करण्यात आली सभापतीपदी भाजपाच्या वजाबाई नामदेव भिल तर उपसभापतीपदी त्रिवेणीबाई शिवाजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती निवडणुकीत भाजपाचे 5 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 सदस्य निवडून आल्याने भाजपाचे बहुमत सिद्द झाले होते अनुसूचित जमातीसाठी सभापतीपद राखीव असल्याने वजाबाई नामदेव भिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसभापती पदी शिरुड येथील त्रिवेणीबाई शिवाजी पाटील यांची निवड करण्यात आली.

यांची होती उपस्थिती: यावेळी आमदार स्मिता वाघ, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी आमदार बी.एस. पाटील, जि.प. सदस्या सोनू राजू पवार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, भाजपा मा तालुकाध्यक्ष मिलिंद पाटील, माजी जि.प. सदस्य संदीप पाटील यांच्यासह नवनिर्वाचित पं.स. सदस्य व सदस्या उपस्थित होते तर महेश पाटील मच्छिंद्र पाटील, जिजाबराव पाटील, भिका पाटील, नाटेश्वर पाटील, महेंद्र बोरसे, बापूराव महाजन, भाईदास पाटील यांच्यासह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

भडगाव सभापतीपदी हेमलता पाटील
उपसभापतीपदी प्रताप सोनवणे
भडगाव । भडगाव पंचायत समिती सभापती व उपसभापतीपदाची निवडणूकी आज पार पडली. यात शिवसेनाच्या हेमलाता विकास पाटील तर उपसभापती पदी राष्ट्रवादीचे प्रताप सोनवणे यांचा दोन विरूद्ध चार मतांनी विजय झाला असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. शिवसेनेकडून सभापती पदासाठी हेमलता विकास पाटील तर भाजपाकडून डॉ. अर्चना पाटील तसेच उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून प्रताप सोनवणे व भाजपाकडून अलकाबाई पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणुक प्रक्रीयेत कोणीही माघार न घेतल्यामुळे निवडणुक घेण्यात आली.त्यात सभापतीपदी शिवसेनाच्या हेमलता पाटील तर उपसभापतीपदी प्रताप सोनवणे यांना विजयी घोषीत करण्यात आले. निवडणुक प्रक्रीया अधिकारी म्हणून तहसीलदार सी.एम.वाघ व सहाय्यक अधिकारी सुभाष जाधव यांनी काम पाहीले.

मुक्ताईनगरला सभापतीपदी भाजपच्या शुभांगी भोलाणे
उपसभापती प्रल्हाद जंगले बिनविरोध
मुक्ताईनगर । पंचायत समितीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत आठ पैकी सहा जागांवर भाजपाने बाजी मारली होती. तसेच उरलेल्या दोन जागांपैकी प्रत्येकी एक एक जागेवर शिवसेना व राष्ट्रवादीच्या खात्यात गेल्या होत्या. आणि मुक्ताईनगर सभापतीपद अनुसूचित जमाती राखीव आहे व त्यासाठी उचंदा गणातुन शुभांगी चंद्रकांत भोलाणे या विजयी झालेल्या होत्या त्यामुळे त्यांची या पदावर निवड निच्चीत होती. मात्र उपसभापती पदावर कोणाची वर्णी लागते याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागुन होते. आज झालेल्या निवडीत सभापती पदासाठी शुभांगी चंद्रकांत भोलाणे व उपसभापती पदासाठी प्रल्हाद हरी जंगले यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. यावेळी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य विकास पाटील, सुवर्णा साळुंखे, विद्या पाटील, राजेंद्र सावळे उपस्थित होते. तर एकमेव निवडुन आलेल्या शिवसेनेच्या व राष्ट्रवादीच्या सदस्या बैठकीला गैरहजर होत्या. दुपारी 3:30 वाजता पीठासीन अधिकारी तथा तहसिलदार जितेंद्र कुंवर यांनी सभापतीपदी शुभांगी भोलाणे व उपसभापतीपदी प्रल्हाद जंगले यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी गटविकास अधिकारी डी.आर. लोखंडे उपस्थित होते. निवड घोषित होताच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच पंचायत समिती कार्यालयापासून भाजप कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढली. यावेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहीनी खडसे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटिल, जिल्हा परिषद सदस्य जयपाल बोदडे, निलेश पाटील, वैशाली तायडे, वंदना गवळे, भाजप तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, योगेश कोलते, विनोद सोनवणे, सरपंच ललित महाजन, चंद्रकांत भोलाणे आदिंसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भुसावळ पंचायत समितीत भाजपचा झेंडा
भुसावळ । पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी हात उंचावून निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये भाजपाचे सभापतीपदाचे उमेदवार सुनिल श्रीधर महाजन हे चार मतांनी विजयी झाले. तर उपसभापती पदी मनिषा पाटील या विजयी झाल्या. भुसावळ पंचायत समितीवर एकूण सहा सदस्यांपैकी भाजपाचे सर्वाधिक चार सदस्य निवडून आले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक सदस्य असे संख्याबळ आहे. सभापती पदासाठी भाजपाचे सुनिल श्रीधर नेहेते व राष्ट्रवादीतर्फे आशा संतोष निसाळकर यांचे प्रत्येकी एक अर्ज तर उपसभापती पदासाठी भाजपाकडून मनिषा भालचंद्र पाटील तर राष्ट्रवादीतर्फे विजय सुरवाडे यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. यामध्ये पिठासीन अधिकारी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी हात उंचावून मतदान घेतले तेव्हा सभापती पदासाठी सुनिल नेहेते यांना सुनिल नेहेते यांचे स्वत:सह प्रिती पाटील, मनिषा पाटील, वंदना उन्हाळे या चार सदस्यांनी मतदान केले. तर आशा निसाळकर यांना त्यांचे स्वत:चे व शिवसेना उमेदवार विजय सुरवाडे यांचे मतदान मिळाले. उपसभापती पदासाठी मनिषा पाटील यांना यांच्या स्वत:सह वंदना उन्हाळे, सुनिल नेहेते, प्रिती पाटील यांनी मतदान केले. तर शिवसेनेचे विजय सुरवाडे यांना स्वत:सह आशा निसाळकर यांनी हात उंचावून मतदान केले. मतदान प्रक्रिया पार पडताच निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी सभापती पदासाठी सुनिल नेहेते तर उपसभापती पदासाठी मनिषा पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पंचायत समितीत विजय मिळवून सत्ता स्थापन केली. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने आमच्यावर विश्‍वास दाखविला असून तालुक्यात विकास कामांना गती देण्यात येऊन रखडलेली कामे पुर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल. देशात व राज्यात भाजपाचे राज्य आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेवटच्या स्तरापर्यंत सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणार.
– सुनिल महाजन, नवनिर्वाचित सभापती

महिला उपसभापतीपदाचा मान मिळाल्याने तालुक्यातील महिलांना भेडसावणार्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार, ग्रामीण भागात महिलांसाठी गावोगावी सार्वजनिक शौचालय उभारणी करण्यात येईल. तसेच इतरही काही समस्या महिलांना भेडसावतात त्या सोडविण्यात येतील, माझ्या मतदारसंघासह तालुकावासियांना जास्तीत जास्त सोयी सुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले जाईल.
– मनिषा पाटील, नवनिर्वाचित उपसभापती

चोपडा पं.स.त भाजप-सेना युतीचा झेंडा
चोपडा । येथील पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपचे आत्माराम गोरख म्हाळके (विरवाडे गण)तर उपसभापती पदावर शिवसेनेचे मच्छिंद्र वासुदेव पाटील (घोडगाव गण) यांची सात विरूध्द पाच मतांनी निवड करण्यात आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार दिपक गिरासे यांनी केली. दरम्यान उमेदवारी दाखल करण्याच्या वेळेत सभापती पदासाठी भाजपतर्फे आत्माराम म्हाळके यांनी भरत बाविस्कर याच्या सूचनेने तर तर राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या कल्पना यशवंत पाटील (सनपुले), सुर्यकांत खैरनार यांच्या सुचनेवरुन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच उपसभापती पदासाठी शिवसेनेचे मच्छींद्र पाटील यांनी रामसिंग पवार यांनी सुचना दिली. तसेच राष्ट्रवादीच्या कल्पना दिनेश पाटील (धानोरा) यांनी मालूबाई कोळी यांच्या सुचनेवरुन उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

विजयी उमेदवारांची वाजत गाजत मिरवणूक
पंचायत समितीत भाजप व राष्ट्रवादी कॅाग्रेस प्रत्येकी 5 व शिवसेनेचे 2 असे बलाबल आहे. सभापतीपद सर्वसाधारण आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी बीडीओ ए.जे.तडवी, नायब तहसीलदार डॉ.स्वप्नील सोनवणे, सी.टी.गोस्वामी यांनी सहकार्य केले. दरम्यान कुणीही माघार न घेतल्याने मतदान होवून म्हाळके व सेनेचे पाटील यांना प्रत्येकी सात तर रा.कॅा. उमेदवारांना प्रत्येकी पाच मते पडली. तहसीलदार गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हात उंचावून मतदान नोंदविलेले गेले. यावेळी सर्व नवनिर्वाचित प्रतिभा पाटील, अमिनाबी तडवी, भुषण भील, पल्लवी भील आदी उपस्थित होते. यावेळी विजयी उमेदवारांची वाजत गाजत, आदिवासी नृत्याच्या अनोख्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणूकीत यांचा सहभाग
यानंतर मिरवणूकीने राष्ट्रपुरूषाच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. मिरवणुकीत माजी जि.प.सदस्य शांताराम पाटील, तिलक शहा, प्रदीप पाटील, राजू शर्मा, शशीकांत देवरे, शशीकांत पाटील, नरेंद्र पाटील, ताराबाई पाटील, रंजना नेवे, हिंमतराव पाटील, गजेंद्र जायसवाल, नारायण बोरोले, प्रकाश पाटील, रमेश पवार, डॅा.विजय कासट, गजेंद्र सोनवणे, ज्योती पाटील, बापू चौधरी, हनुमंत महाजन, पी.जे.पाटील, लक्ष्मण पाटील,शिवसेनेचे गट नेता महेश पवार, हरिष पाटील, दिपक जोहरी, संजय पोतदार, महेंद्र धनगर,विकास पाटील, राजु बिटवा, राजाराम पाटील, प्रा.शरद पाटील, आबा देशमुख, पप्पू सोनार, प्रकाश राजपुत, गुलाबराव पाटील, दिपक चौधरी, किशोर चौधरी, महेंद्र भोई आदी हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.

रावेर सभापतीपदी माधुरी नेमाडे
रावेर । रावेर पंचायत समितीच्या सभापतीपदी माधुरी नेमाळे तर उपसभापतीपदी अनिता चौधरी यांची आज बिनविरोध निवड झाली. रावेर पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घोडे-पाटील, तहसीलदार विजयकुमार ढगे, गटविकास अधिकारी सानिया नाकाडे यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली सभापती उपसभापति पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी या विशेष सभेसाठी पंचायत समिती सदस्या योगिता वानखेड़े, कविता कोळी, जुम्मा तडवी, जितेंद्र पाटिल, प्रकाश महाजन, धनश्री सावळे, प्रतिभा बोरवले, रुपाली कोळी, योगेश पाटिल, दीपक पाटील पंचायत समितीच्या पहिल्याच सभेला उपस्थीत होते. यावेळी नवनिर्वाचित सभापती, उपसभापती, सदस्य, यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जि.प. शिक्षण सभापती सुरेश धनके, जि.प. सदस्य नंदकिशोर महाजन, कैलास सरोदे, रंजनाताई पाटील, नंदाताई पाटील, जिल्हाउपाध्यक्ष पद्माकर महाजन, मिलिंद वायकुळे, माजी जि.प. सदस्य कोकीळा पाटील, माजी पं.स.सदस्य महेश पाटील, गोपाळ नेमाळे, अलकाताई चौधरी, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, सरचिटणीस वासुदेव नरवाड़े, महेश चौधरी, शिवाजीराव पाटील, कृउबा समिति सभापती डॉ.राजेंद्र पाटील, उपसभापती प्रमोद धनके, संचालक पितांबर पाटील, निळकंठ चौधरी, कृष्णराज पाटील, गोंडु महाजन अरुण पाटील, प्रल्हाद पाटील, अमोल पाटील, सरपंच श्रीकांत सरोदे, अजबराव पाटील, संदीप सावळे, मनोज श्रावग आदि उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारींनी निवडीची घोषणा करताच कार्यकत्यांनी एकच जल्लोष केला. तसेच फटाके फोडुन गुलालाची ऊढळन करून उपस्थितांना पेढे वाटप करण्यात आले होते.

पक्षाने माझ्यावर ठेवलेला विस्वासाला तळा जाऊ देणार नाही ग्रामीण भागाचा विकास हाच आमचे ध्येय आहे यामध्ये घरकुल,शौचालय,आरोग्य,शिक्षण, दलितवस्तिच्या योजना यावर भर देऊन सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविणार असल्याचे नवनिर्वाचित पंचायत समिती
– सभापती माधुरी नेमाळे

पंचायत समितीच्या जास्तीत जास्त योजना जनते पर्यंत पोहचविन्यासाठी प्रयत्न करणार ग्रामीण भागातील जनतेच्या तालुक्यावर पायपिट होणार नाही यासाठी गाव पातळीवर समितीच्या योजना राबविता येतात का आल्यास कार्यक्रम घेऊन थेट गाव पातळीवर लाभ मिळवुन देणार असल्याचे नवनिर्वाचित
– उपसभापती अनिता चौधरी

एरंडोल सभापतीपदी रजनी सोनवणे तर उपसभापतीपदी विवेक पाटील
एरंडोल । एरंडोल पंचायत समिती सभापती व उप सभापती पदाची निवडणूक दुपारी 3 वाजता पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या रजनी मोहन सोनवणे यांनी राष्ट्रवादीच्या निर्मलाबाई मालाचे यांचा पराभव केला तर उपसभापती पदी सेनेचे विवेक पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पिठाशीन अधिकारी तथा तहसीलदार सुनिता जर्‍हाड यांनी केली. सभापती पदासाठी शिवसेनेच्या रजनी सोनवणे यांना 4 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या निर्मलाबाई मालाचे यांना अवघी दोन मते मिळाली. तर उपसभापती पदासाठी सेनेचे विवेक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती पदासाठी हात उंच करून मतदान करण्यात आले यावेळी शिवसेनेचे प.स.सदस्य अनिल महाजन,शांताबाई महाजन, रजनी सोनवणे, विवेक पाटील, राष्ट्रवादीच्या निर्मला मालाचे, अपक्ष रेशामाबी पठाण उपस्थित होते तर जि.प.सदस्य नाना महाजन, वैशाली गायकवाड हजार होते. निवड जाहीर झाल्यानंतर माजी आमदार चिमणराव पाटील, तालुका प्रमुख वासुदेव पाटील, जि.प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, दशरात महाजन, जगदीश पाटील, हिंमत पाटील, मोहन सोनवणे, राजेंद्र पाटील, तालुक्यातील सेनेचे सरपंच उपसरपंच, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभापती व उपसभापती दोघेही पदाधिकारी हे विखरण -रिंगणगाव गटातील रिंगणगाव व विखरण गणाचे सदस्य आहेत निवड जाहीर झाल्यानंतर शिवसैनिकांनी फटाक्यांची अतिश बाजी व गुलाल उधळून पेढे वाटून आनंद साजरा केला.

तालुकानिहाय निवड याप्रमाणे
जळगाव – जळगाव सभापतीपदी यमुनाबाई रोटे (भाजपा) तर उपसभापदीपदी शितल पाटील (शिवसेना)
भुसावळ – सभापतीपदी सुनिल नेहेते (भाजपा) तर उपसभापतीपदी मनिषा पाटील (भाजपा).
चोपडा – सभापतीपदी आत्माराम म्हाळके (भाजपा) तर उपसभापतीपदी मच्छिंद्र पाटील (शिवसेना).
रावेर – सभापतीपदी माधुरी नेमाडे (भाजपा) तर उपसभापतीपदी अनिता चौधरी (भाजपा)
एरंडोल – सभापतीपदी रजनी सोनवणे (शिवसेना) तर उपसभापतीपदी विवेक पाटील (शिवसेना).
चाळीसगाव – सभापतीपदी स्मितल बोरसे (भाजपा) तर उपसभापतीपदी संजय पाटील (भाजपा)
बोदवड – सभापतीपदी गणेश पाटील (भाजपा) तर उपसभापतीपदी दिपाली राणे (भाजपा).
यावल – सभापतीपदी संध्या किशोर महाजन (भाजपा) तर उपसभापतीपदी उमाकांत पाटील (काँग्रेस).
पारोळा – सभापतीपदी सुनंदा पाटील (राष्ट्रवादी) तर उपसभापतीपदी अशोक पाटील (राष्ट्रवादी)
जामनेर – सभापतीपदी संगीता पिठोडे (भाजपा) तर उपसभापतीपदी गोपाल नाईक (भाजपा).
पाचोरा – सभापतीपदी सुभाष पाटील (भाजपा) तर उपसभापतीपदी अनिता पवार (कॉग्रेस)
धरणगाव – सभापतीपदी मंजुषा पवार (शिवसेना) तर उपसभापतीपदी प्रेमराज पाटील (शिवसेना)
अमळनेर – सभापतीपदी वजाबाई भिल (भाजपा) तर उपसभापतीपदी त्रिवेणीबाई पाटील (भाजपा)
भडगाव – सभापतीपदी हेमलता पाटील (शिवसेना) तर उपसभापतीपदी प्रताप सोनवणे (राष्ट्रवादी)
मुक्ताईनगर – सभापतीपदी शुभांगी भोलाणे (भाजपा) तर उपसभापती प्रल्हाद जंगले (भाजपा)