पंजाबमध्ये भाजपकडून सिद्धू विरोधात फतवा; प्रत्येक जिल्ह्यात पुतळा जाळा

0

अमृतसर- विजया दशमी निमित्त अमृतसर येथे रावण दहन करतांना झालेल्या रेल्वे दुर्घटनेत ६१ जणांना जीव गमवावा लागला. यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान भाजपने यासाठी पंजाब सरकारमधील मंत्री माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू यास जबाबदार धरले असून त्यांच्या विरुद्ध फतवा जाहीर केला आहे. पंजाबमधील प्रत्येक जिल्ह्यात नवज्योतसिंग सिद्धू यांचा पुतळा जाळण्यात यावे असा फतवा भाजपने जाहीर केले आहे.

अमृतसर रेल्वे दुर्घटना झाल्यानंतर सिद्धू यांच्या पत्नीने घटनास्थळावरून पळ काढला असे आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.