नवी दिल्ली : दोन वर्षापुर्वी ‘पाच साल केजरीवाल’ अशी घोषणा देत दिल्लीकरांची मते जिंकलेल्या आम आदमी पक्षाला आता त्याच दिल्लीच्या मतदारांची भिती वाटू लागली आहे. कारण पुढल्या महिन्यात तीन महापालिकांच्या निवडणूका होत असून, त्यात पराभूत झाल्यास केजरीवाल यांच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्नचिन्ह लागणार आहे. गोव्यात भोपळा व पंजाबात भ्रमनिरास झाल्यावर दिल्लीत आलेल्या केजरीवालना आता मतदाराची भिती सतावते आहे. कारण मागल्या दोन वर्षात त्यांनी दिल्लीकरांना कचर्यात ढकलून देण्याचे अपप केलेले आहे.
सत्ता मिळाल्यावर केजरीवाल यांनी यशस्वी सरकार चालवण्यापेक्षा अन्य राज्यात सत्ता संपादनासाठी पक्ष केंद्रीत केले. त्यासाठी दिल्लीच्या जनतेचा पैसाही अन्यत्र खर्च केला. मात्र त्याच काळात दिल्लीत अनेकदा सफ़ाई कामगारांचा संप होऊन अवघ्या दिल्लीचा उकिरडा झाला होता. पावसाळ्यात कुजलेल्या कचर्याने अनेक रोगांच्या साथी पसरल्या. तेव्हा केजरीवालसह त्यांचे अनेक मंत्री बेपत्ता होते. त्यामुळे या पक्षाविषयी दिल्लीत कमालीची नाराजी पसरली आहे.
दिल्ली ही देशाची राजधानी असून त्या महानगराची तीन महापालिकांमध्ये विभागणी झालेली आहे. प्रशासकीय सोयीसाठी त्याची ती्न महापालिकांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्याच तिन्ही पालिकांच्या निवडणूका पुढल्या महिन्यात होत असून, दिल्लीकर आपल्याला धडा शिकवतील म्हणून भयभीत झालेले केजरीवाल व त्यांचे सहकारी आता दिल्लीच्या नागरिकांना खुश करण्यासाठी धडपडू लागले आहेत. मात्र पराभवाचीच खात्री असल्याने त्यांनी आता मतदान यंत्रात गडबड असल्याचा कांगावा आधीच सुरू केला आहे.