संशयावरून आरपीएफने जप्त केले होते सव्वा किलो सोने अन् 23 किलो चांदी
भुसावळ- जीएसटीसह अन्य कर न भरता मुंबई-फिरोजपूर पंजाब मेलमधून भोपाळ व इटारसीला नेले जाणारे सव्वा किलो सोने, 23 किलो चांदी, महागडी घड्याळे, आयफोन असा 68 लाख 70 हजार रुपयांच्या ऐवजासह गाडीच्या एस-2 या डब्यातील सीट क्र.57 आणि एस-6 डब्यातील सीट क्र. 44 वरून प्रवास करणार्या कुलदीप नरेंद्रसिंह यादव (वय 42, रा. नीळकंठ कॉलनी, भोपाळ) व भगवानदास अमृतलाल (वय 52, रा. सोना सावरी, ता. इटारसी, जि.होशंगाबाद) यांना रेल्वे सुरक्षा बलाने रविवारी रात्री 11.30 वाजता ताब्यात घेतले होते. दोन्ही संशयितांसह आरपीएफने मुद्देमाल कस्टम एक्साइज विभागाच्या ताब्यात दिल्यानंतर आरोपींची सोमवारी जामिनावर मुक्तता करण्यात आली.
यांच्या पथकाने केली कारवाई
रेल्वे सुरक्षा बलाचे सुरक्षा आयुक्त अजयकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे आरपीएफ निरीक्षक दिनेश नायर, उपनिरीक्षक घनश्याम यादव, अरुण थवरे, एस.के. चव्हाण, एन.एम. महाजन, सिंद कुमार, नरेंद्र पोगाड, अंबिका प्रसाद यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.