पंजा खालच्या मनगटात ताकत राहिलेली नाही; भाजपच्या ‘रम्या’चा कॉंग्रेसला डोस !

0

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराला वेग आला आहे. राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करीत आहे. भाजपने विरोधी पक्षावर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. सोशल मीडियावर भाजपाने निवडणूक काळात विरोधकांवर आरोप करण्यासाठी ‘रम्याचे डोस’ हे सदर सुरु केले आहे. दररोज नवनवीन विषयावर यामाध्यमातून विरोधकांवर टीकेची तोफ धडाडते. दरम्यान आज प्रथमच काव्य स्वरूपात ‘रम्याचे डोस’ भाजपने दिले आहे. यात कॉंग्रेसवर खरमरीत टीका करण्यात आली आहे.

कॉंग्रेसवर टीका करताना भाजपने आता कॉंग्रेसच्या पंजातील मनगटात ताकत राहिलेली नाही. अंतर्गत विरोधामुळेच पक्ष पोकळ होत चालला आहे अशी टीका करण्यात आली आहे. ‘ फाटक्यात पाय त्याला करणार काय?’ असे म्हणत कॉंग्रेसला लक्ष केले आहे.