पंटरला पुन्हा कामावर न घेतल्याने एकाला मारहाण

0

नवापूर। तालुक्यातील बेडकीपाडा चेक पोस्ट नाक्याच्या वादातून परस्पर विरोधी गुन्हे नवापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले असून दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयाने 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली.शुक्रवारी रात्री अमिन हमीद शेख याला 41 जणांनी निर्वस्त्र करून मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर विरोधी पक्षाकडून परस्पर विरोधी जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी अमीन हमीद शेख रा.मुसलमान मोहल्ला, नवापूर याचा विरूध्द रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला.

12 संशयित आरोपींना अटक
पोलिस सूत्रांकडून मिळालेला माहितीनुसार शुक्रवारी सकाळी नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा येथील हॉटेल किरणवर चहानाश्ता करत असताना अमीन हमीद शेख सीमा तपासणी नाक्यावर आला खिशातील चाकू काढत जातीवाचक शिवीगाळ केली व माझ्या गाळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चैन व खिशातील हजार रूपये काढून नवापूरकडे पळ काढला. कमलेश गावित व त्याचा मित्रांनी त्याचा पाठलाग केला. त्याचा शोध घेतला असता दुपारी दीड वाजता अमीन शेख कॉलेज रोड वरील सुझुकी शोरूम वर बसला होता. त्याठिकणी सर्व मित्र गेले हिसकावून घेतलेले पैसे व दागिने परत कर असे सांगितले त्याचा राग येऊन जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात अमीन हमीद शेख वर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमीन शेख सहीत दोन्ही गुन्हातील 12 संशयित आरोपींना अटक केली असून 28 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जातीवाचक गुन्हेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार करीत आहे.इतर गुन्हेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष भंडारी करीत आहे.