पंडित जवाहरलाल नेहरु यांना अभिवादन

0

पर्यावरण विभागातर्फे पुण्यतिथी साजरी

पिंपरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाच्यावतीने भोसरी औद्योगिक परिसरात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी निगार बारस्कर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभाग उपाध्यक्ष दिलीपसिंग मोहिते, महासचिव अशोक मंगल, महासचिव अमर नाणेकर, सचिव अशोक काळभोर, प्रवक्ता आयुष मंगल, पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष उमेश बनसोडे, उपाध्यक्ष गुरुदेव लक्ष्मण वैराळ पिंपरी चिंचवड काँग्रेस सचिव एस टी कांबळे, श्‍वेता मंगल, नेहा मंगल, आयुवीर मंगल, अक्षांश मंगल, के के राव, रावसा अर्नाळ, सुनील पवार, सोनी श्रीवास्तव, गगन भूल, अमृत बहादूर, भीमाशंकर सरगुंडी, सुरेश कानिटकर, नवनाथ भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

महापालिकेच्यावतीने अभिवादन
पिंपरी – माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, संतोष जाधव व जोपा पवार आदी उपस्थित होते. तसेच नेहरुनगर येथील त्यांच्या अर्धाकृती पुतळयास माजी महापौर हनुमंत भोसले व अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.