पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

0

जळगाव । भारतीय राजनीतीतील सुसंस्कृत व आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय पंडित दिनदयालजी उपाध्याय यांची जन्मशताब्दी वर्ष हे भारतीय जनता पक्ष देश भर साजरा करीत असून ह्या संदर्भात 25 सप्टेंबर 2017 सोमवार रोजी पंडितजींच्या जन्मोत्सव जयंतीनिमित्त भाजपा महाबळ परिसर मंडळ मधील प्रभाग क्रमांक 29 / 36 व 37 मध्ये पंडित दिनदयालजींना प्रतिमा पुजन करून मानवंदना देण्याचा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे ‘बेटी बचाव बेटी पढाव’चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्रजी फडके, महानगर संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, मनपा गटनेता सुनील माळी, भाजपा महाबळ मंडळाध्यक्ष राहुल वाघ, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, नगरसेविका ज्योती चव्हाण, राजेंद्र घुगे पाटील, मंडळ उपाध्यक्ष नितिन सपके, शिरीष पाटील, कैलास पवार, मंडल सरचिटणीस रमेश सोनार प्रभाग विस्तराक जितेंद्र चव्हाण, महेंद्र पाटील, मंडल युवा मोर्चे अध्यक्ष शाम पाटील, महिला मोर्चा मंडल जय नागराज पाटील, ललित बडगुजर, सोशियल मीडिया प्रमुख आशिष वाणी, मनहोर तेजवणी, अमित देशपांडे, संजय महाजन, विजय तुलसी, नितिन राणे, मिलिंद वाघ, धनराज चौधरी यांच्यासह बुध सदस्य उपस्थित होते.