मुंबई: भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात पायलने आक्षेपार्ह टिप्पणी केल्या प्रकरणी राजस्थान पोलिसानी तिला अहमदाबाद येथून आज सकाळी अटक केली. रविवारी सकाळी तिला अटक केली. स्वतः पायने तिला अटक केल्याचं ट्वीट करून सांगितलं. आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल पायल रोहतगीविरोधात कलम ६६ आणि ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पायलने पंतप्रधान ऑफिस आणि गृह मंत्रालयाला टॅग करून ट्वीट करत म्हटलं की, ‘मला राजस्थान पोलिसांनी मोतीलाल नेहरू यांच्यावर व्हिडिओ बनवला म्हणून अटक केली. मी जे बोलले ती सर्व माहिती गूगलवरून घेतली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एक थट्टा राहिली आहे. एसपी ममता गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल रोहतगी विरोधात याचिका दाखल झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली.