पंड्याची माझ्याशी तुलना नको

0

नवी दिल्ली । भारताचे माजी क्रिकेट कर्णधारकपिल देव यांनी भारतीय संघातील अष्टपैलु क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याच्यासंदर्भात एक मोठे वक्तव्य केले आहे. हार्दिक पंड्याला भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून संबोधले जाते आणि त्याची तुलना कपिल देव यांच्यासोबत अनेकदा करण्यात येते. कपिल यांच्यानंतर भारताचा सर्वश्रेष्ठ ऑलराऊंडर म्हणून हार्दिक असल्याचे बोलले जाते. मात्र, हार्दिक पंड्याने दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसर्‍या सामन्यात केलेल्या खराब प्रदर्शनामुळे कपिल देव चांगलेच नाराज झाले आहेत. कपिल देव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, जर हार्दिक पंड्या अशाच प्रकारे चुका करत राहिला तर माझ्यासोबत त्याची तुलना होऊ शकत नाही. मी कपिल देव याच्यासोबत खूप क्रिकेट खेळलो आहे. कपिलने चांगली कामगिरी करत 15 वर्ष भारतासाठी खेळला आणि पंड्या आता कुठे आपला पाचवी कसोटी सामना खेळत आहे. अजून खूप लांबचा प्रवास करायचा आहे असेही संदीप पाटील यांनी म्हटले आहे.

दुसर्‍या कसोटी सामन्यामध्ये हार्दिक पंड्याने दोन्ही डावांमध्ये निराशाच केली. वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी याने टाकलेला चेंडू उजव्या स्टंपच्या बाहेर जात असताना हार्दिकने खेळण्याचा प्रयत्न केला आणि कॅच आऊट झाला. पहिल्या डावामध्ये पंड्या रन आऊट झाला कारण त्याने आपली बॅट क्रिजवर ठेवली नव्हती. पंड्याच्या या निष्काळजीपणावर विश्‍लेषकांनीही टीका केली होती. संदिप पाटील यांनी म्हटले की, कपिल देव आणि हार्दिक पंड्यांची तुलना करणे योग्य नाही कारण, पंड्याने आता कुठे आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली आहे.

दुसर्‍या कसोटीत अपयशी
हार्दिक पंड्याने केवळ पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावामध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यात त्याने 93 धावांची खेळी खेळली होती. यानंतर दुसर्‍या कसोटी सामन्यामध्ये पंड्या पूर्णपणे अपयशी ठरला.