सोलापूर: पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज मतमोजणीचा दिवस आहे. कोविड स्थितीमुळे मतमोजणी केंद्रावर फक्त १४ टेबल मांडण्यात आली आहेत. परिणामी मतमोजणी संथगतीने होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम निकाल यायला रात्रीचे ९ ते १० वाजणार आहेत. पंढरपूर मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. येथे महाविकास आघाडीकडून भालके यांचे पुत्र भगीरथ भालके नशीब आजमावत आहेत तर भाजपकडून समाधान अवताडे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. या दोघांतच मुख्य लढत होती. ही निवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांसाठीही प्रतिष्ठेची आहे. तीस फेर्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून समाधान अवताडे यांना ८९ हजार ३७ मते तर भगीरथ भालके यांना ८२ हजार १२७ मते. भाजपाचे अवताडे यांची आघाडी कायम आहे.