भुसावळ । आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार्या वारकर्यांच्या सेवेसाठी रेल्वे प्रशासनाने न्यु अमरावती पंढरपुर व नागपुर – पंढरपुर अशा विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. गाडी क्रमांक 01155 न्यु. अमरावती – पंढरपुर ही गाडी 28, 29 जून तसेच 1 व 2 जुलै रोजी दुपारी 2 वाजता पंढरपुरकडे रवाना होईल. तर परतीला ही गाडी 01156 या क्रमांकाने 29 व 30 जून तसेच 5 व 6 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता पंढरपुरहुन अमरावतीकडे रवाना होईल.
प्रवासादरम्यान या स्थानकांवर थांबणार गाडी
दरम्यान ही गाडी न्यु अमरावती, बडनेरा, मुर्तीजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापुर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, भिगवन, जैऊर, कुर्डुवाडी, पंढरपुर या स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीला न्यु अमरावती स्थानकाहुन 7 साधारण डबे तर खामगाव स्थानकाहुन 11 साधारणा डबे असणार आहेत. तर गाडी क्रमांक 01226 नागपुर – पंढरपुर ही गाडी 1 व 3 जुलै रोजी सकाळी 7.50 वाजता नागपुर स्थानकाहुन सुटेल परतीला ही गाडी क्रमांक 01225 ने 2 व 5 जुलै रोजी सकाळी 5.30 वाजता पंढरपुरहुन रवाना होणार आहे. ही गाडी अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदुर, बडनेरा, मुर्तीजापुर, अकोला, शेगाव, मलकापुर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगांव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपुर या स्थानकांवर थांबणार आहे.