पंढरपूर नगरातील अल्पवयीन बालकाचे अपहरण

Kidnapping of 14-year-old minor from Nashirabad जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथील पंढरपूर नगरातून 14 वर्षे अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. याबाबत मंगळवार, 25 ऑक्टोंबर रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
नशिराबाद शहरातील पंढरपूर नगरात 14 वर्षे अल्पवयीन मुलगा हा आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. गुरुवार, 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघड झाला. दरम्यान मुलाच्या नातेवाईकांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला, परंतु तो कुठेही मिळून न आल्याने मंगळवार, 25 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता नशिराबाद पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.