घाटकोपर । राज्यशासनाने संत वाङ्मयाचा अभ्यास नसणार्या व्यक्तींना पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस् पदी वर्णी लावून संत परंपरा टिकवणार्या वारकर्यांचे व सांप्रदायाचे पावित्र्यच धोक्यात आणल्याने महाराष्ट्रातील संपूर्ण वारकरी सांप्रदाय सरकारच्या या समिती निर्णयाच्या विरुद्ध 10 ऑक्टोबरला आझाद मैदानावर भजनी आंदोलन छेडणार असल्याचे श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी संघाने केले आहे. सरकारने नियुक्त केलेल्या समितीच्या विरुद्ध समस्त वारकरी सांप्रदायाच्या भावना भडकल्या असून सरकारने सध्याची असलेली समिती बरखास्त करून नवीन समिती नेमावी यामागणीसाठी वारकरी आझाद मैदानात उतरणार आहेत.
वारकर्यांची करा नेमणूक
आमचा मंदिर समितीला किंवा कोणत्याही सदस्याला विरोध नाही तर केवळ मंदिराचे आणि वारकरी सांप्रदायाचे पावित्र्य जपण्याकरिताच समितीवर वारकर्यांची नेमणूक करावी असे कराडकर यांनी बोलताना केले. या पत्रकार परिषदेला गाथा मंदिर ( देहू ) चे संस्थापक हभप पांडुरंग महाराज घुले, वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी हभप राजाभाऊ चापेदार, अध्यक्ष मारुती कोकाटे, वारकरी शिक्षण संस्थेचे हभप प्रकाश महाराज जावंजाळ, आमदार नरेंद्र पाट आदी मान्यवर उपस्थित होते.
संत वाड्मयांचे ज्ञान असणारे वारकरी नियुक्त करा
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बारा सदस्यांची असून 3 जुलै रोजी सरकारने 9 सदस्यांची नेमणूक केली आहे. यामध्ये वारकरी 2 तर उर्वरित 7 जण हे वारकरी नाहीत. या सात जणांना वारकरी ज्ञान नाही. त्यांचे विचार भिन्न आहेत. त्यामुळे सरकारने नेमलेली समिती हि लाखो वारकरी भावनांच्या विरुद्ध आखलेला खेळ आहे. वारकर्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर समितीत संत वाङ्मयाचे ज्ञान असणारेच समितीवर असायला हवेत हि प्रमुख मागणी व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक हभप बंडातात्या कराडकर यांनी परिषदेत व्यक्त केले.