संतांच्या मार्गदर्शनामुळे सर्व जण आशावादी बनले. अशा संतांपैकी एक म्हणजे संत नरहरी सोनार हे एक आहेत. त्यांचे नाव महाराष्ट्राल्या संत परंपरेत जणू सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैवपंथी होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. रामचंद्रदास, कृष्णदास, हरिप्रसाद, मुकुंदराज, मुरारी, अच्युत आणि नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. संत नरहरी सोनार यांच्या जीवनावर आधारित ‘कटिबंध’ नावाचा मराठी चित्रपट गेल्या 23 ऑगस्टला प्रदर्शित होऊन गेला. त्याचे संपादन रमेश औटी आणि निर्मिती संजय जाधव यांची होती. त्यांची मंगळवारी, 11 फेब्रुवारी 2020 रोजी पुण्यतिथी असून त्यानिमित्त त्यांना त्रिवार वंदन…! त्यानिमित्त पंढरीचा थोर महात्मा संत नरहरी महाराज यांच्या कार्याच्या महतीचा घेतलेला वेध……..
महाराष्ट्र ही संतांची पुण्यभूमी मानली जाते. याभूमीत अनेक थोर संत, महात्मे होऊन गेले. संत ज्ञानदेवांपासून ते आजपर्यंतच्या सर्व संतांनी समता-बंधुता याचबरोबर समाजातील दृष्ट प्रवृत्ती नष्ट करून सत्प्रवृत्तीची जोपासना करण्याची शिकवण देऊन महाराष्ट्राची भूमी पावन केली. त्यामुळे संतांच्या मार्गदर्शनामुळे सर्व जण आशावादी बनले. अशा संतांपैकी एक म्हणजे संत नरहरी सोनार हे एक आहेत. त्यांचे नाव महाराष्ट्राल्या संत परंपरेत जणू सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैवपंथी होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. रामचंद्रदास, कृष्णदास, हरिप्रसाद, मुकुंदराज, मुरारी, अच्युत आणि नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. संत नरहरी सोनार यांच्या जीवनावर आधारित ‘कटिबंध’ नावाचा मराठी चित्रपट गेल्या 23 ऑगस्टला प्रदर्शित होऊन गेला. त्याचे संपादन रमेश औटी आणि निर्मिती संजय जाधव यांची होती. त्यांची मंगळवारी, 11 फेब्रुवारी 2020 रोजी पुण्यतिथी असून त्यानिमित्त त्यांना त्रिवार वंदन…! त्यानिमित्त पंढरीचा थोर महात्मा संत नरहरी महाराज यांच्या कार्याच्या महतीचा घेतलेला वेध……..
श्री संत नरहरी महाराजांचा जन्म पंढरपूर येथे संवत् शके 1115 श्रावण मास शुक्ल पक्ष त्रयोदशी नक्षत्र अनुरुधा बुधवार रोजी पहाटे प्रातःकाळी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अच्युतबाबा तर मातोश्रींचे नाव सावित्रीबाई होते. ते दोघेही शिवभक्त होते. त्यांच्या बारशाच्या निमित्ताने चांगदेव महाराज देवळात आले. त्यांनी नरहरींना पाहिले व त्यांच्यासह त्यांच्या माता-पित्यांना आशीर्वाद दिला. हा मुलगा म्हणजे हरि (विठ्ठल) व हराचा(शंकर) समन्वय साधणारा थोर संत होईल, याला दीर्घायुष्य प्राप्त होईल. तो शिवभक्त असला तरी विठ्ठलाचा भक्त म्हणून त्रिखंडात प्रसिद्ध होईल. चांगदेवांचे हे भविष्य ऐकून सर्वांना आनंद झाला.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर नरहरी महाराज यांचा विवाह मंगळवेढा येथील श्रीपती पोतदार यांची कन्या गंगाबाई यांच्याशी झाला. सकाळी उठून नदीवर स्नान करणे, मल्लीकार्जुनची मनोभावे पूजा करणे, ओम नम: शिवाय मंत्राचा जप करणे, नंतर आपला सोनाराचा व्यवसाय करणे असा त्यांचा दिनक्रम होता. पंढरपूरजवळील कोर्टी गावी त्यांचे वास्तव होते.
विविध अठरापगड जाती-जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता. संत नरहरी सोनार यांचा दागिने बनविण्याचा व्यवसाय होता. त्यांची कलाकुसर त्यावेळी नावाजलेली होती. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगला जम बसविला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव-आराधना करत असे. रोज पहाटे ज्योतिर्लिंगावर ते बेलपत्र वाहत. ते कट्टर शिवभक्त असल्याने दुसर्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती. त्यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत होता.
एके दिवशी नरहरी सोनार पाण्याची घागर घेऊन घाईघाईने चालले असता वाटेत त्यांना नारदमुनी भेटले व ते त्यांना म्हणाले, आज एकादशी आहे. पांडुरंगाचे नाव घे, नरहरींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यावर शिवभक्ती व विठ्ठलभक्ती एकच आहे. हे दाखविण्याकरता नारदांनी एक युक्ती केली. दौलताबाद येथील एका सावकारास अपत्य नव्हते. त्यामुळे ते पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनास जाऊन नवस केला.पांडुरंगा, मला मुलगा होऊ दे, तुला मी सोन्याचा करदोरा घालीन. हा नवस फळाला आला. त्यांना मुलगा झाला.पांडुरंगाच्या मंदिरातील एक पुजार्याला त्यांनी विचारले, येथे चांगला सोनार कोण आहे? त्यावर पुजार्याने नरहरी सोनारांचे नाव सांगितले.
सावकार नरहरीकडे आले व त्यांना झालेली सर्व हकिकत सांगितली. नरहरी म्हणाले, विठ्ठलाच्या कमरेचे माप मला आणून द्या, त्याप्रमाणे मी करदोरा बनविन. भक्ताने माप आणले व नरहरींना दिले. त्याप्रमाणे त्यांनी दोरा बनवून दिला. पण तो काही विठ्ठलाच्या कमरेला बसेना. तेव्हा पुन्हा तो करदोरा मोठा करून दिला तर तो मोठा झाला. असे अनेक वेळा झाले. तेव्हा सावकाराने नरहरींना विठ्ठल मंदिरात येण्याची विनंती केली. प्रथम त्यांनी या गोष्टीस नकार दिला. पण शेवटी डोळ्याला पट्टी बांधून ते मंदिरात आले. विठ्ठलाच्या कमरेचे माप घेऊ लागले. पण त्यांना विठ्ठलाच्या कमरेच्या जागी व्याघ्रचर्म, रुद्रमाळा, डमरू, असल्याचा भास झाला. असे दोन-तीन वेळा झाले. तेव्हा त्यांना पटले की हरि व हर हे एकच आहेत. दिवसेंदिवस नरहरींचे लक्ष व्यवसायाकडे कमी व भक्तीमार्गाकडे अधिक वळू लागले. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगाला म्हणाले,
॥ देवा तुझा मी सोनार ॥ तुझ्या नामाचा व्यवहार ॥
इतर संताच्या सहवासात त्यांना आनंद होऊ लागला. अभंगरचनेसाठी त्यांनी बराच काळ घालविला. त्यांना प्रत्यक्ष संत ज्ञानेेश्वरांचा सहवास लाभला. त्यांच्या ज्ञानाचा, वाणीचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्यांनी त्यांच्या सोनाराच्या व्यवसायातील अनेक शब्दांची सांगड अध्यात्माशी घालून अभंगांच्या रचना केल्या.
देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नामसोने ।
त्रिगुणाची करून मूस । आत ओतिला ब्रम्हरस ।
जीव शिव करुनी फुंकी । रात्रंदिवस ठोकाठाकी ।
विवेक हातवडा घेऊन । कामक्रोध केला चूर्ण ।
मन बुद्धीची कातरी । रामनाम सोने चोरी ।
ज्ञान ताजवा घेऊन हाती । दोन्ही अक्षरे जोखिती ।
खांद्या वाहोनी पोतडी । उतरला पेंल थंडी ।
यासारख्या प्रतिमातून त्यांनी संसार करून आपले जीवन जगताना परमार्थ कसा साधता येतो हे त्यांनी मार्मिकपणे सांगितले. ब्रह्म हे सगुण आहे की निर्गुण? याविषयी एखाद्या तत्ववेत्त्याप्रमाणे सोनाराचा व्यवसाय करणारे नरहरी सहजपणे ब्रह्मतत्त्वाची व्याख्या करून जातात आणि सांगतात. देव एकमेव अद्वितीय आहे. त्याने अनंत रूपे, अनंत वेष, आणि अनेक अवतार घेतले असले तरी माणसाने इच्छित देवतांची उपासना केली पाहिजे. नरहरी महाराजांचा जन्मच हरि-हराचा वाद मिटविण्यासाठी झाला. नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव सोनार (महामुनी) होते, असे असे म्हटले आहे. संत नरहरी सोनार यांचे मूळ आडनाव महामुनी, गोत्र सनातन, शाखा यजुर्वेद विश्व ब्राम्हण असून त्यांची समाधी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर आहे, समाधीची पूजा अर्चना वंशज श्री महामुनी यांच्यातर्फे केली जाते. संत नरहरी सोनार हे वडिलोपार्जित सुवर्णकाम करीत असल्याने त्यांचे आडनाव पुढे सोनार असे झाले. पंढरपूर येथे त्यांचे वंशज प्रमोद दिगंबरराव महामुनी यांचे वडिलोपार्जित विश्वकर्मा निवास म्हणून जुने घर आहे. नरहरी महाराजांच्या पादुका आणि देव पूजेतील पितळी विठ्ठल मूर्ती त्यांच्याकडे असून षोडशोपचारे पूजा केली जाते. वंशज प्रमोद महामुनी हे पौरोहित्य करतात.
अशा प्रकारे संतश्रेष्ठ नरहरींची प्राणज्योत विठ्ठलाच्या तेजामध्ये एकरुप झाली. वंशपरंपरेनुसार नरहरी महाराजांचा समाधी शके पार्थिव नाम संवस्तर शके 1235 माघ वद्य तृतिया सोमवार इसवी सन 1285 पुण्यतिथी असा हा पंढरीचा थोर महात्मा समस्त सुवर्णकारांचे भूषण होते. वयाच्या 96व्यावर्षी विठ्ठलाच्या चरणी विसावले. त्यांनी रामनामाचे पुण्य, संतवाङ्य दौलत साठवली होती. त्यांना कोणत्याही आशा-आकांक्षा उरल्या नव्हत्या.
॥ आम्ही गुप्त होऊ विठ्ठलाचे घरी जाऊ ॥ असे ते नेहमी म्हणत. नरहरी महाराजांचा आदर्श आजच्या काळात बोधप्रद ठरणारा आहे. ‘मरावे परी किर्तीरुप उरावेफ ह्याप्रमाणे त्यांचे काव्य आणि ते किर्तीरुपाने अजरामर झाले.