पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा

0

नंदुरबार । पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, फळ वाटप, स्वच्छता कर्मचार्‍यांचा सन्मान या कार्यक्रमांचा समावेश होता. शहादा येथे भाजपातर्फे शहादा पालिकेतील 70 सफाई कामगारांना कपडे वाटप आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान शेतकर्‍यांना कर्ज माफी, ऑनलाईन फॉर्म व रुग्णानां ग्रामीण रूग्णालयात फळवाटप पदाधिकार्‍यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, डॉ. किशोर पाटील, जितु जमदाळे, दिनेश खंडेलवाल, नगरसेविका रूमाल पवार, सइदा अन्सारी, रविंद्र जमादार, रियाज कुरेशी, साजिदअन्सारी आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोतिलाल पाटील म्हणाले की, ज्या माणसाला 4 वेळा व्हिजा नाकारला त्याचा अमेरिकेतील राष्ट्र अध्यक्षांनी मोदीजींना मानसंन्माने बोलवून सत्कार केला यासारखे दुसरे काहीच असु शकत नाही. मोदीजींना वाढदिवसाला अनंत शुभेच्छा.

महाराष्ट्रात विजेचा तुटवडा कमी होणार
आमदार पाडवी म्हणाले की, मोदीजी 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पंधरवाडा हा दिवस या देशातील जे स्वच्छतेचे काम करतात त्यांच्या संन्मानानिमित्ताने राबविला जाणार आहे. हे केवळ मोदीजींमुळे शक्य झाले आहे. 70 वर्षाच्या कार्यकाळात कोणी ही करु शकले नाही. ही गर्वांची बाब आहे. सरदार सरोवराच्या आज मोदीजींच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याने महाराष्ट्रात विजेचा तुटवडा कमी होणार आहे. स्वच्छता करणार्‍या सेवकांचा नागरिकांनी मानसन्मान करावा, असे अहवान आ.पाडवी यांनी केले. सुत्रसंचालन निलेश पाटील यांनी केले.

नेत्र तपासणी शिबीर
तळोदा । येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रदेशसदस्य डॉ. शशिकांत वाणी यांच्या निवासस्थानी मोफत नेत्र शिबिर तपासणी आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन आ.उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. शशिकांत वाणी,प्रा. विलास डामरे, अजय परदेशी, हेमलाल मगरे, राजेंद्रसिंग राजपूत उपस्थित होते. शिबिरात 170 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी 19 रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालय दाखल करण्यात आले. शिबिरासाठी अंधजन मंडळ पुणे व कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालयाचे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी रुपसिंग पाडवी,बब्बू माळी, रसीकलाल वाणी, विवेक चौधरी, कौशल सवाई,गोकुळ मिस्त्री, सुभाष शिंदे, दीपक चौधरी,जगदीश परदेशी, प्रदिप माळी व भाजपचे पधादिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशावितेसाठी भीमराव महाले,योगेश चव्हाण, दीपक मालपुरे,पुरुषोत्तम चिंचोले, दत्तात्रय पाटील, भूषण येवले यांनी कामकाज पाहिले.

गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन
नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कुलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 68 व्या जन्मदिनानिम्मित आयोजित करण्यात आलेल्या गीत गायन कार्यक्रमाचे दीप प्रज्वंलन भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ चौधरी,जेष्ठ नगरसेवक हिरालाल काका चौधरी,उद्योगपती डॉ रवींद्र बापू चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोर्चा प्रदेश सरचिटणीस पंकज जैन, भाजपा शहर अध्यक्ष मोहनभाई खानवणी,केतन रघुवंशी, रामभैया कडोसे आदि होत.