मुंबई । उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले होते की, कुटूंबातील व्यक्तीसाठी तिकीट मागू नका, असे भाजपा नेत्यांना बजावल होते.मात्र हा नियम मुंबई होणार्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत लागू होत नसल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय हा फक्त उत्तर प्रदेशसाठी लागू असल्याचे चित्र मुंबईच्या भाजपा नेते, आमदार, आणि खासरदारांच्या वर्तनातून दिसत आहे. यासर्वांनी आपल्या मुलांना तिकिट मिळावे म्हणून लॉबिंग सुरू केली आहे.मुंबईतील सर्व नेत्यांना पदे हे आपल्या घरात असावी असे वाटतांना दिसत आहे.त्यामुळे ते आपल्या मुलांना किंवा नातेवाईकांना तिकिटे मांगता दिसत आहे.
लॉबींगसाठी नेते रेसमध्ये
काँग्रेसवर नेहमी घराणे शाहीचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे.राज्यात व केंद्रात भाजपाची सत्ता असल्याने नेत्यांनी मुलांना तिकीट मिळवण्यासाठी धडपड सुरू केली आहे.तिकीटवाटप कसं करायचं यासाठी भाजपने समितीही नेमण्यात आली आहे. मुलांसाठी लॉबिंग सुरु असलेले भाजप नेते- खासदार किरीट सोमय्या याचे पुत्र नील सोमय्यायासाठी मुलुंड,गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता याचे सुपुत्र हर्ष मेहता घाटकोपर, आमदार राज पुरोहित याचे सुपुत्र आकाश पुरोहित -कुलाबा, महिला,बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकुर याचे दिपक ठाकुर याच्यासाठी गोरेगाव , माजी आमदार रमेश ठाकुर यांनी सागर ठाकुर यांच्यासाठी गोरेगाव याठिकाणी उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. तर काही नेत्यांनी आपल्या पुत्रांनी व नातेवाईकांनी मतदारासंघात कार्यक्रम सुरु आहेत.