रायबरेली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रायबरेलीत एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. भाजपाने अमेठी आणि रायबरेलीला काहीही दिले नाही, उलट जे होते ते ओरबाडून घेतले आहे. त्यामुळे येथे आता भाजापाचे लोक आले तर त्यांना सांगा की तुम्हाला पंतप्रधानांची लाज वाटायला हवी.
येथे महामार्ग बनणार होता, मात्र झाला नाही. येथे फूडपार्क बनणार होते ते ही झाले नाही. पंतप्रधान खोटे बोलतात, ते पहिल्यांदा देवाचे नाव घेतात आणि त्यानंतर खोटे बोलतात. त्यांनी तरुणांना नोकऱ्या दिल्या नाहीत की, १५ लाख रुपयेही दिले नाहीत.
जर केंद्रात आमचं सरकार आलं तर अमेठी आणि रायबरेलीचा विकास होईल. लोकसभेसाठी काँग्रेस उत्तर प्रदेशात पूर्ण ताकदीने लढणार आहे. आम्ही मायावती, अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव यांचा सन्मान करतो. मात्र, आमच्या विचारधारेसाठी आम्ही लढणार आहोत. अमेठी आणि रायबरेलीशी माझं राजकीय नव्हे तर कौटुंबिक नातं आहे. त्यामुळे मी कुठेही गेलो तरी इथल्या लोकांसाठी काम करीतच राहिल.