चाळीसगाव। भाारताला स्वातंत्र मिळुन 2022 मध्ये 75 वर्ष पूर्ण होणार असून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान आवास योजना सर्वांसाठी घरे – 2022 देशभरात राबवली जात आहे. महाराष्ट्र शासनाचा देखील घरकुल योजना राबविणे महत्वाकांक्षी उपक्रम आहे. चाळीसगाव शहरात देखील सदर योजना प्राधान्यक्रमाने राबविण्याचे नियोजन सुरु आहे. त्यासाठी सर्वसामन्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्राकडून मदत दिली जात आहे. झोपडपट्टी मुक्त चाळीसगाव शहर यासाठी आराखडा तयार केला जावा असे प्रतिपादन खासदार ए.टी. पाटील यांनी केले. रविवारी 14 रोजी चाळीगाव शहरात खासदार पाटील यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
सामान्यांच्या स्वप्नातील शहर
2022 पर्यत देशातील प्रत्येक नागरिकांकडे हक्काचा एक घर असावा यासाठी शासनातर्फे पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना इत्यादी घरकुल संबंधी योजना शासन राबवित आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील जनतेला याचा लाभ मिळत आहे. सर्व सामान्य नागरिकांच्या स्वप्नातील चाळीसगाव शहर घडवायचा असून यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने कटीबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार उन्मेश पाटील यांनी योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केले.
शहर विकासासाठी
चाळीसगाव नगरपालीकेत अनेक वर्षानंतर सतांतर झाले आहे. ज्यांना भारतात कुठेही स्वतःचे घर नसेल असा व्यक्ती पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेऊ शकतात. नगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. पालिका प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख होऊन जनतेच्या सेवेसाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. घरकुलाचे लाभ घेण्यासाठी नगरपालिकेत असलेल्या सर्वेक्षण संस्थेकडूनच अधिकृत नोंदणी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मोफत बाळंतपण
चाळीसगाव तालुका हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. शहरतील गर्भवती महिलांसाठी मोफत बाळंतपण करण्याचे उपक्रम नगरपालिकेतर्फे सुरु करण्यात येणार आहे. शहरात जन्माला येणार्या प्रत्येक कन्येसाठी ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ योजना जून महिन्यापासून सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन चाळीसगाव नगरपालिका व नवनिर्माण महिला बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट व महिला उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी चाळीसगाव आमदार उन्मेश पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्ष आशाबाई चव्हाण, नगरसेवक शेखर बजाज, प्रीतमदास रावलानी, हेमांगीताई पूर्णपात्रे, विनोदभाई फल्लन, बाळासाहेब नागरे, राजेंद्र चौधरी, संजय पाटील, भाऊसाहेब पाटील, विश्वास चव्हाण, घृष्णेश्वर पाटील, विजया भिकन पवार, विजया प्रकाश पवार, झेलाबाई पाटील, वत्सलाबाई महाले, संजय राजपूत, सोमसिंग राजपूत, नितीन पाटील, आनंद खरात, रोशन जाधव, अरुण अहिरे, बाळासाहेब मोरे आदी उपस्थित होते.