नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रीमंडळाच्या रविवारी सकाळी झालेल्या विस्तारानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या नियोजीत चीन दौर्यासाठी रवाना झाले आहेत. 3 सप्टेंबर रविवारपासून सुरू होणार्या ब्रिक्स संमेलनात ते सहभागी होवून भारताची कणखर भूमिका मांडणार आहेत. चीनच्या शिआमेन शहरात हे शिखर संमेलन आयोजित करण्यात आले आहे. डोकलाम वादावर दोन्ही देशांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. या वादाचा ब्रिक्स परिषदेवर प्रभाव पडू नये म्हणून चीनने एक पाऊल आधीच मागे घेतले आहे.चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीकडे लक्ष लागले आहे.