पंतप्रधान झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच रायबरेलीत; अनेक प्रकल्पांचे लोकार्पण

0

लखनौ- उत्तर प्रदेशमधील रायबरेली हा मतदार संघ सोनिया गांधी यांचा बालेकिल्ला मानला जातो. दरम्यान पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदा रायबरेलीमध्ये आले आहेत. येथे अनेक विकास कामाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. जाहीरसभेपूर्वी मोदी यांनी हमसफर कोचला हिरवा झेंडा दाखवला.

मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिलीच रॅली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमधून पंतप्रधान आपल्या २०१९ च्या निवडणूकीच्या रणसंग्रामाला सुरूवात करण्याची शक्यता आहे. रायबरेलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकास कामांचा शुभारंभ करून जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेससह विरोधकांवर हल्लाबोल केला. ३०० प्रकल्पांचे लोकार्पण होणार असून यामध्ये विमानतळ आणि ७ उड्डाणपुलांचा समावेश आहे.