नवी दिल्ली । येथे आज आंतरराष्ट्रीय उर्जा परिषदेच्या 16 व्या मंत्रीस्तरीय संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेमध्ये विविध देशांतील मंत्री, प्रमुख अंतरराष्ट्रीय संगठणेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या संमेलनामध्ये जागतीक उर्जेच्या भविष्याविषयी चर्चा करण्यात येणार आहे.
या संमेलनासाठी अमेरिका, चीन, जपान, रुस, साऊदी अरब, इराण, संयुक्त अरब, अमिराती, कतर तसेच नायझेरिया या प्रमुख देशांसह 90 राष्ट्रांचे मंत्री तसेच प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या बैठकीदरम्यान, जागतीक स्तरावर होणारे बदल, संक्रमावस्थेतील धोरणे आणि नव्या औद्योगिक बाबी कशाप्रकारे मार्केटमध्ये स्थिरता प्राप्त करताहेत त्याचबरोबर उर्जा क्षेत्रात पुढील धोरणांविषयी चर्चा करण्यात येणार आहे.