पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उपोषण – लोकशाहिच्या शत्रूंना उघडे पाडण्याचे केले आवाहन

0

नवी दिल्ली । संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या सत्रात विरोधकांनी घातलेल्या गोंधळाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी उपोषणास्त्र उगारले. त्यांनी भाजपच्या सर्व खासदारांना आपापल्या मतदारसंघात एक दिवसाच्या उपोषणास बसण्यास सांगितले आहे. या संदर्भात दिलेल्या एका संदेशात मोदी म्हणाले, ‘आपल्या मतदारसंघातील जनतेला एकत्र करा आणि उपोषण करा. उपोषण करुन लोकशाहीच्या शत्रुंना उघडे पाडा. ‘पक्षाच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, ‘मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते देशातील विविध भागात उपोषण करुन विरोधकांना विरोध करणार आहेत.’