पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भुसावळात रक्तदान शिबिर

0

दात्यांचा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद : 31 बाटल्या रक्तसंकलन

भुसावळ- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदी विचार मंचतर्फे शहरातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात 31 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.

रक्तदानाचा उपक्रम स्तुत्य -युवराज लोणारी
मानव धर्मातील सर्वात श्रेष्ठ दान रक्तदानाला म्हटले जाते. रक्ताच्या कमरतेमुळे अनेकांना जीव गमवावा लागतो त्यामुळेच असे शिबिर वेळोवेळी झाले पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेला हा रक्तदानाचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे विचार नगरसेवक युवराज लोणारी यांनी व्यक्त केले..

शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
रक्तदान शिबिराला पु.ओ.नाहाटा तसेच शासकीय आय.टी.आय.मधील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. रक्तदानाची सुरवात स्थानिक माजी नगरसेवक बापू महाजन यांनी स्वतः रक्तदान करून केली. रक्तदान शिबिराला धन्वंतरी रक्तपेढीचे डॉ.प्रवीण महाजन, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा शैलजा पाटील, पराग भोळे, परीक्षीत बर्‍हाटे यांची विशेष उपस्थिती होती. प्रसंगी 78 वेळेस रक्तदान करणारे रोटरी क्लब भुसावळचे माजी अध्यक्ष राजीव सेहगल, 38 वेळा रक्तदान करणारे ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण तसेच 31 वेळेस रक्तदान करणारे वेलनेस फाउंडेशनचे संचालक नीलेश गोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यांनी घेतले परीश्रम
नरेंद्र मोदी विचार मंचचे तालुकाध्यक्ष नारायण कोळी, शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, प्रा.प्रशांत पाटील, पितांबर पाटील, विनीत हंबर्डीकर, किरण वाणी, राजश्री नेवे, अतुल चौधरी, रेहमान शेख, बालु दिघे यांनी परीश्रम घेतले.

सूत्रसंचालन अनिरुद्ध कुलकर्णी यानी केले तसेच उपस्थितांचे आभार किरण वाणी यांनी मानले..