नवी दिल्ली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ‘महाराष्ट्र विकास आघाडी’च्या सरकारचा शपथविधी सोहळा आज गुरुवारी शिवाजी पार्कवर पार पडला. यात मुख्यमंत्री म्हणून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. शपथविधी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. मोदींनी मुख्यमंत्री यांचे अभिनंदन करत महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. मात्र ते आले नाही.