मुंबई – आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजपाच्या धोरणांवर हल्लाबोल चढवताना संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अशिक्षित-अडाणी असा उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘चलो जीते है’ लघुपट जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला निरुपम यांनी विरोध दर्शवला. ‘मुलांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. पंतप्रधान मोदींकडून शाळेतील विद्यार्थी काहीही शिकणार नाहीत.मोदींसारख्या अशिक्षित आणि अडाणी व्यक्तीच्या आयुष्यावर बनवण्यात आलेला लघुपट पाहून मुले काय शिकणार आहेत?. पंतप्रधानांकडे किती डिग्री आहेत, हेदेखील लोकांना माहिती नाही”.