पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंपारण्यात

0

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमधील चंपारण्याच्या मोतिहारीमध्ये महात्मा गांधींच्या चंपारण्य सत्याग्रहाच्या ठिकाणी वर्षभर सुरू असलेल्या शतक महोत्सवामध्ये सहभागी होणार असून, येथील गांधी मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतरच जवळजवळ 20 हजार स्वच्छतादूतांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाचे औचित्य साधून नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काही नवीन योजना देशवासियांना अर्पण करणार आहेत.

महात्मा गांधी यांचा बिहार दौरा आणि चंपारण्य सत्याग्राच्या आठवणींना उजाळा देण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे गेल्या वर्षभरापासून येथे आयोजन करण्यात आले आहे. 2019 साली महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी होणार आहे. तोपर्यर्ंंत या कार्यक्रमाद्वारे प्रशासनाद्वारे उघड्यावर शौचास बसण्यापासून मुक्ती करण्यावर लक्ष्य केंद्रीत करण्यात येणार आहे.