पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांना भेटणार

0

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुद्रा योजनेद्वारे लाभार्थी ठरलेल्या नवउद्योजकांची भेट घेणार आहेत. युवक लाभार्थ्यांना भेटण्यास उत्सुक असलेल्या मोदींनी असे ट्वीट केले आहे.

2015 साली सुरू झालेल्या या योजनेद्वारे अनेक नवउद्योजकांना कर्ज उपलब्ध करून त्यांचा उद्योग-व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. मुद्रा योजनेद्वारे मोठ्या प्रमाणात अनुसुचित जाती, मागासवर्गीय समुदायाच्या तरुण तसेच महिलांना लाभ मिळाला आहे. या वर्षीच्या 23 मार्चपर्यंत 28 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त 4 कोटी 53 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. बालक, किशोरवयीन व तरुण अशा तीन वर्गात कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.