नवी दिल्ली : भारत देशात कोरोना विषानुचा वाढता प्रादुर्भाव पाहता, आज रात्री ८ वाजता पुन्हा एकदा देशाला संबोधीत करणार आहे. याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून ट्वीटर वरून देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठ करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत. तसेच मोदी एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आणखी एक ट्वीट करत पीएमओने सांगितलं आहे की, ‘पंतप्रधानांनी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत समिक्षा करण्यासाठी एका उच्च स्तरीय बैठक बोलावली होती. ट्वीटमध्ये सांगितलं आहे की, ‘कोरोनाशी लढा देण्यासाठी भारताला आणखी मजबुत करण्याच्या पद्धतींवर चर्चा करणार.’
सध्या देशांत कोरोना बाधितांची संख्या वाढून 151 झाली आहे. त्यापैकी 25 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात 45 कोरोना बाधित आहेत. तर महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रूग्ण केरळमध्ये आहेत.