नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या कर्नाटक दौऱ्यात तुमकुर मध्ये शिवकुमार स्वामींच्या स्मारक संग्रालयाच्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. तर दुसऱ्या ठिकाणी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० चा शुभारंभ करणार आहेत
कर्नाटक राज्याला कृषि कर्मण पुरस्कार पंतप्रधान मोदींच्या हस्ते देण्यात येणार आहे. या कर्यक्रमावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरपा आणि श्री सिद्धलिंगेश्वर स्वामी देखील उपस्थित राहणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनूसार (पीएमओ) किसान सन्मान निधी योजनेचा तिसऱ्या हप्त्याचा लाभ देशातील सहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार असून एकूण १२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यातील २००० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप आला नसल्याने नव्या वर्षात उरलेल्या रकमेसह खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे.