नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिस आयुक्तांना याबाबतचा मेल आला आहे. हा मेल नेमका कोणी पाठवला आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र या मेलमुळे पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका असल्याचे समोर आले आहे. या मेलमुळे सुरक्षा यंत्रणा आणि दिल्ली पोलिस यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
प्राथमिक अंदाजानुसार हा मेल पूर्वेकडील राज्यातून आल्याचे सांगण्यात येत असून या पार्श्वभूमीवर मोठ्या स्तरावर चौकशी सुरु आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच यामागे कोणाचा हात आहे ते समोर येईल. याआधीही काही महिन्यांपूर्वी माओवाद्यांकडून मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.